Holi 2020 Special Trains: होळी निमित्त कोकणवासीयांसाठी मध्य रेल्वे चालवणार पनवेल, मुंबई ते करमाळी स्थानकादरम्यान 20 विशेष ट्रेन्स
दरम्यान यंदा 9 मार्च सोमवारी होळी आणि 10 मार्च दिवशी धुलिवंदन आहे. विकेंडला जोडूनच हा सण आल्याने कोकणात जाणार्या गाड्यांची गर्दी पाहता विशेष ट्रेन्स चालवल्या जाणार आहेत.
Holi Special Central Railway Trains for Konkan: मध्य रेल्वे कडून होळी आणि लॉंग विकेंड दरम्यान कोकणात जाणार्या चाकरमान्यांच्या सोयीसाठी विशेष ट्रेन्स चालवण्याचा निर्णय मध्य रेल्वेने (Central Railway) घेतला आहे. मध्य रेल्वे दरवर्षीप्रमाणे यंदाही कोकणवासियांसाठी होळी/ शिमगा सणाच्या पार्श्वभूमीवर विशेष 20 ट्रेन्स चालवणार आहेत. दरम्यान यंदा 9 मार्च सोमवारी होळी (Holi) आणि 10 मार्च दिवशी धुलिवंदन (Dhulivandan) आहे. विकेंडला जोडूनच हा सण आल्याने कोकणात जाणार्या गाड्यांची गर्दी पाहता विशेष ट्रेन्स चालवल्या जाणार आहेत. या ट्रेन्सचं बुकिंग 14 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. यासाठी तिकीटांचे विशेष दर आकारले जाणार आहेत. मुंबई - करमाळी (Mumbai- Karmali) आणि पनवेल - करमाळी (Panvel-Karmali) या स्थानकांदरम्यान स्पेशल ट्रेन्स चालवल्या जाणार आहेत.
कोकणवासियांसाठी शिमगा आणि भाद्रपद गणेश चतुर्थी हा सण खास असतो. त्यासाठी हमखास मुंबई, पुण्यासाठी काम, नोकरी धंद्यासाठी गेलेला कोकणवासीय परत येतो. त्यामुळे यंदा गोवा, कोकण भागात असलेल्या तुमच्या घरी शिमगा साजरा करण्यासाठी तुम्ही जाणार असाल तर पहा या विशेष ट्रेन्सचं बुकिंग करू शकता.
दरम्यान मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार लोकमान्य टिळक टर्मिनल्स ते करमाळी दरम्यान 12 विशेष ट्रेंस धावतील तर पनवेल ते करमाळी स्थानकादरम्यान 8 विशेष ट्रेन्स धावणार आहेत.
इथे पहा होळी/ शिमगा विशेष ट्रेन्सचं संपूर्ण वेळापत्रक
कोकणात जाणार्या होळी स्पेशल ट्रेन्ससाठी मोबाईलवरून युटीएस अॅपवरून तिकीट बुक करता येऊ शकते. सोबतच irctc.com वर देखील तिकीटांचं बुकिंग 14 फेब्रुवारीपासून खुले होणार आहे. तसेच या स्पेशल ट्रेन्समध्ये सेकंड क्लास कोचेस हे अनारक्षित राहणार आहेत. त्यामुळे तिकिटं न काढता या डब्बामधून प्रवाशांना थेट प्रवास करता येणार आहे.