मुंबई: मध्य रेल्वे वाहतूक विस्कळीत होण्याचे रडगाणे पाचव्या दिवशीही सुरुच, प्रवाशांचे हाल, स्थानकांवर गर्दीच गर्दी
त्यामुळे मध्य रेल्वेवर सीएसटीएमकडे येणाऱ्या लोकल गाड्यांची वाहतूक सुमारे २० ते २५ मिनिटे उशिराने सुरु होती. रेल्वे वाहतूक विस्कळीत होऊन गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले तरी, रेल्वे प्रशासन अनेकदा उद्घोषणा करुन प्रवाशांना या घटनेची माहितीही देत नाही. त्यामुळेही अनेकदा प्रवाशांचा संताप होतो.
Central Railway Trains Late: तांत्रिक अडचणीमुळे वाहतुक सेवा विस्कळीत होण्याचे मध्य रेल्वेचे रडगाणे सलग पाचव्या दिवशीही सुरुच आहे. शुक्रवारी (14 जून 2019) दुपारीही मुलुंड रेल्वे स्थानकात शॉर्ट सर्किट झाल्याची घटना घडली आणि पुन्हा एकदा रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली. प्राप्त माहितीनुसार या शार्ट सर्किटचा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या दिशेने जाणाऱ्या धीम्या मार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला आहे.
मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत होण्याचा आजचा सलग पाचवा दिवस आहे. या आधी गुरुवारी संध्याकाळीही मध्य रेल्वेची वाहतूक सेवा अशिच विस्कळीत झाली होती. ठाणे ते मुलुंड रेल्वे स्थानकांदरम्यान रेल्वे रुळाला तडा गेल्याने मध्य रेल्वेची वाहतूक गुरुवारीही विस्कळीत झाली होती. त्यामुळे जलद मार्गावरील वाहतूक धिम्या मार्गावर वळविण्यात आली होती. (हेही वाचा, ठाणे-मुलुंड स्थानकादरम्यान रुळाला तडे, मध्य रेल्वे वाहतूक सेवा विस्कळीत)
ट्विट
दरम्यान, मंगळवारी सकाळीही असाच काहीसा प्रकार घडल्याने मध्य रेल्वे वाहतूक सेवा विस्कळीत झाली होती. त्यामुळे मध्य रेल्वेवर सीएसटीएमकडे येणाऱ्या लोकल गाड्यांची वाहतूक सुमारे २० ते २५ मिनिटे उशिराने सुरु होती. रेल्वे वाहतूक विस्कळीत होऊन गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले तरी, रेल्वे प्रशासन अनेकदा उद्घोषणा करुन प्रवाशांना या घटनेची माहितीही देत नाही. त्यामुळेही अनेकदा प्रवाशांचा संताप होतो.