Central Railway Train Cancelled: मध्य रेल्वेकडून 26 डिसेंबर ते 6 जानेवारी दरम्यान अनेक रेल्वे गाड्या रद्द
रद्द करण्यात आलेल्या गाड्यामध्ये कलबुर्गी-कोल्हापूर एक्स्प्रेस, मिरज - परळी डेमू, मिरज - कुर्डुवाडी डेमू, कोल्हापूर - नागपूर एक्स्प्रेस, कोल्हापूर-धनबाद एक्सप्रेस, यशवंतपूर -पंढरपूर एक्स्प्रेस यांचा समावेश आहे.
जर तुम्ही मध्य रेल्वेने प्रवासकरत असाल तर ही बातमी नक्की वाचा कारण मध्य रेल्वेच्या काही ट्रेन रद्द करण्यात आल्याने प्रवाशांच्या अडचणी वाढणार आहेत. पुणे विभागातील सांगली-मिरज (Sangli- Miraj) सेक्शन दरम्यान एनआय आणि ट्रॅफिक ब्लॉकच्या कामाकरता काही रेल्वे गाड्या रद्द तसेच काही गाड्यांच्या मार्गात बदल करण्यात आले आहेत. रद्द करण्यात आलेल्या गाड्यामध्ये कलबुर्गी-कोल्हापूर एक्स्प्रेस, मिरज - परळी डेमू, मिरज - कुर्डुवाडी डेमू, कोल्हापूर - नागपूर एक्स्प्रेस, कोल्हापूर-धनबाद एक्सप्रेस, यशवंतपूर -पंढरपूर एक्स्प्रेस यांचा समावेश आहे. (हेही वाचा -Mumbai Special Local Train For New Year: मुंबईकरांसाठी खुशखबर! नवीन वर्षाच्या स्वागतासाठी धावणार विशेष लोकल ट्रेन, पहा अतिरिक्त लोकलचे वेळापत्रक)
रद्द करण्यात आलेल्या गाड्या
- 26 डिसेंबर ते 6 जानेवारीपर्यंत गाडी क्र. 22155 कलबुर्गी-कोल्हापूर एक्स्प्रेस रद्द
- 26 डिसेंबर ते 6 जानेवारीपर्यंत गाडी क्र 22156 कोल्हापूर-कलबुर्गी एक्स्प्रेस रद्द
- 26 डिसेंबर ते 6 जानेवारीपर्यंत गाडी क्र 11412 मिरज - परळी डेमू रद्द
- 27 डिसेंबर ते 6 जानेवारीपर्यंत गाडी क्र 11411 परळी- मिरज डेमू रद्द.
- 26 डिसेंबर ते 6 जानेवारीपर्यंत पर्यंत गाडी क्र 01546 मिरज - कुर्डुवाडी डेमू रद्द
- 26 डिसेंबर ते 6 जानेवारीपर्यंत पर्यंत गाडी क्र 01545 कुर्डुवाडी - मिरज डेमू रद्द.
- 29 डिसेंबर, 1 आणि 5 जानेवारीला गाडी क्र 11404 कोल्हापूर - नागपूर एक्स्प्रेस रद्द
- 30 डिसेंबर, 2 आणि 6 जानेवारीला गाडी क्र 11403 नागपूर- कोल्हापूर एक्स्प्रेस रद्द.
- 29 डिसेंबर आणि 5 जानेवारीला गाडी क्र 11045 कोल्हापूर- धनबाद एक्स्प्रेस रद्द
- 1 जानेवारीला गाडी क्र 11046 धनबाद-कोल्हापूर एक्स्प्रेस रद्द.
- 28 डिसेंबर आणि 4 जानेवारीला गाडी क्र 16541 यशवंतपूर - पंढरपूर एक्स्प्रेस रद्द
- 29 डिसेंबर आणि 5 जानेवारीला गाडी क्र 16541 पंढरपूर - यशवंतपूर एक्स्प्रेस रद्द