Kolhapur Rain Updates: मध्य रेल्वे आजपासून 3 दिवस चालवणार मिरज - कराड मार्गावर विशेष रेल्वे; पूरामुळे रस्ते वाहतूक अद्याप विस्कळीत

नागरिकांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेकडून विशेष रेल्वेची सोय सुरू करण्यात आली आहे. आजपासून(8 ऑगस्ट) पुढील 3 दिवस मिरज-कराड मार्गावर विशेष लोकल चालवली जाणार आहे.

Railway | Image used for representational purpose | (फोटो सौजन्य-फेसबुक)

Central Railway Special Trains:  महाराष्ट्रामध्ये पावसाच्या तडाख्याने अनेक ठिकाणी पूर सदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा शहरामध्ये मागील काही दिवसांपासून सतत जोरदार पाऊस कोसळत असल्याने जनजीवन विस्कळीत झालं आहे. नदी, धरण यांनी धोक्याची पातळी ओलांडल्याने आता या भागातील रस्ते वाहतूक विस्कळीत झाली आहे. पावसाचा जोर कमी झाल्यानंतर हळूहळू पाण्याचा निचरा होण्यास सुरूवात झाली आहे. मात्र रस्ते वाहतूक ठप्प असल्याने आता नागरिकांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेकडून विशेष रेल्वेची सोय सुरू करण्यात आली आहे. आजपासून(8 ऑगस्ट) पुढील 3 दिवस मिरज-कराड मार्गावर विशेष लोकल चालवली जाणार आहे.

7 ऑगस्टच्या रात्री बिलवडी स्टेशन जवळ पूलावर पाणी आल्याने पुणे- मिरज या रेल्वे स्थानकादरम्यानची वाहतूक सेवा रात्री 11.50 पासून विस्कळीत झाली आहे. अशी माहिती मध्य रेल्वे कडून देण्यात आली आहे. रायगड, कोल्हापूर,सातारा, सांगली मध्ये पुढील 3 दिवस अतिवृष्टीचे; पुणे शहरात 137% पाऊस

ANI Tweet

सातार्‍यामध्ये पाणीच पाणी झाल्याने वाईचा महागणपती पाण्यात गेला आहे. सांगली, सातारा, पुण्यातील काही गावांचा संपर्क तुटला आहे. प्रशासनाकडून पूरामध्ये अडकलेल्यांची सुटका करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. काल (7 ऑगस्ट) मुख्यमंत्र्यांनी कॅबिनेट मंत्रिमंडळाची बैठक घेतली आहे. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज कोल्हापूर दौर्‍यावर आहेत. पूराच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर , पुण्यातील शाळा, महाविद्यालय बंद ठेवण्यात आली आहेत.