दिवा ते पेण दरम्यान 18 मार्च पासून नवीन मेमू सेवेंचा शुभारंभ; इथे पहा संपूर्ण वेळापत्रक

30 वाजता सुटेल. पेण- दिवा दरम्यान 13 स्थानक आहेत.

Indian Railway | Photo Credits : PTI

दिवा - पेण या मध्य रेल्वेच्या मार्गावर प्रवास करणार्‍यांसाठी खूषखबर आहे. येत्या (18) मार्च पासून दिवा ते पेण रेल्वेस्थानकादरम्यान मेमू च्या 4 फेर्‍या वाढवण्याचा निर्णय मध्य रेल्वे प्रशासनाकडून घेण्यात आला आहे. दरम्यान नव्या गाड्या या 12 डब्ब्यांच्या असून दर आठवड्याला सोमवार ते शुक्रवार या दिवशी त्या चालवल्या जातील. तर विकेंडला म्हणजे शनिवार - रविवार या दिवशी ही सेवा खंडीत असेल. या दरम्यान त्याच्या देखभालीची, दुरूस्तीची कामं केली जातील. यामुळे दिवा-पेण मार्गावरील नियमित प्रवास करणार्‍यांसाठी ही मोठी दिलासादायक बाब असेल.

सकाळी दिवा-पेण मार्गावर पहिली गाडी सकाळी 9.40 ला सुटेल तर पेण हून दिवा कडे येणारी पहिली गाडी सकाळी 8. 30 वाजता सुटेल. पेण- दिवा दरम्यान 13 स्थानक आहेत.

इथे पहा संपूर्ण वेळापत्रक  

सध्या कोकणामध्ये रेल्वे रूळाच्या डागडुजीचं आणि विस्तारण्याचं काम सुरू आहेत. मध्य रेल्वेच्या नागरिकांंना या नव्या रेल्वेसेवेमुळे मोठा दिलासा मिळणार आहे.