आंबिवली-टिटवाळा दरम्यान ओव्हरहेट वायर तुटल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

आंबवली-टिटवाळा दरम्यान ओव्हरहेट वायर तुटल्याने कसाऱ्याहून मुंबई सीएसटीएमच्या दिशेने जाणारी मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प झाली आहे.

Local Train | Representational Image | (Photo Credits: File Photo)

आज (शनिवार, 16/3/2019) दुपारी मुंबईची लाईफलाईन असलेली लोकलसेवा काहीशी विस्कळीत झाली आहे. आंबिवली-टिटवाळा दरम्यान ओव्हरहेट वायर तुटल्याने कसाऱ्याहून मुंबई सीएसटीएमच्या दिशेने जाणारी मध्य रेल्वेची (Central Railway) वाहतूक ठप्प झाली आहे.

रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्यासाठी 45 मिनिटे ते तासाभराचा कालावधी लागू शकतो. या सर्व प्रकारामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

ऐन उन्हाच्या वेळी वाढत्या गर्दीचा त्रास प्रवाशांना सहन करावा लागत आहे.