कल्याण कसारा स्थानकांच्या दरम्यान मध्य रेल्वे एक तासापासून रखडली, प्रवाशांचा संताप
मध्य रेल्वे (Centarl Railway) च्या कल्याण (Kalyan) ते कसारा (Kasara) स्थानकांच्या दरम्यान लोकल सेवा मागील एक तासांपासून पूर्णतः रखडली आहे.
मध्य रेल्वे (Centarl Railway) च्या कल्याण (Kalyan) ते कसारा (Kasara) स्थानकांच्या दरम्यान लोकल सेवा मागील एक तासापासून पूर्णतः रखडली आहे. याबाबत रेल्वे कडून कोणतीही माहिती देण्यात आली नसून मागील एक तास स्थानकांवर होणाऱ्या लोकलच्या उद्घोषणा देखील बंद आहेत. अशा परिस्थितीत लोकल रखडल्याचे नेमके कारणही समजत नसल्यामुळे प्रवाशांचा संताप होत आहे.
पहा लोकांचा संताप
प्राप्त माहितीनुसार, कल्याण आणि कसारा दरम्यान मंगला एक्प्रेस इंजिन मधील बिघाडामुळे काही वेळापासून रखडून पडल्याचे म्हंटले जात आहे. त्यामुळे कल्याण- कसारा- टिटवाळा- खडवली या स्थानकांमध्ये गर्दी झाली आहे तसेच मागील काही लोकल स्थानकांच्या दरम्यान थांबून आहेत.अतिरिक्त इंजिन मागवण्यात आले असून काही वेळातच वाहतूक सुरू होईल असं मध्य रेल्वेने कळवलं आहे.
मागील काही दिवसांपूर्वी देखील मुंबईत अशाच एका प्रसंगात, एक माथेफिरू ठाणे स्थानकात ओव्हरहेड वायरवर चढल्यामुळे मुलुंड ते ठाणे दरम्यान लोकल रखडून पडल्या होत्या. यामुळे मागून येणाऱ्या सर्व ट्रेनचे वेळापतर्क कोलमडून पडले होते.