Diwali 2019 Special Trains: मध्य रेल्वे वर धावणार दिवाळी विशेष 36 ट्रेन्स; येथे पहा संपूर्ण वेळापत्रक आणि ऑनलाईन तिकीट बुकिंग कसं कराल?
त्यामुळे आयत्यावेळेस ट्रीपचा प्लॅन करणार्यांची गैरसोय होऊ नये म्हणून मध्य रेल्वेने 36 नव्या गाड्यांची घोषणा केली आहे.
मध्य रेल्वेने (Central Railway) दिवाळी सणानिमित्त पर्यटक आणि रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी 36 विशेष गाड्या सोडल्या आहेत. लोकमान्य टिळक टर्मिनल्स, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स ते नागपूर, पुणे या मार्गावर काही विशेष गाड्या धावणर आहेत. दिवाळी सुट्टीमध्ये (Diwali Vacation) अनेक पर्यटक शाळांची सुट्टी, सण साजरा करण्यासाठी बाहेर पडतात. यंदा महाराष्ट्र विधानसभा निवडणूक (Maharashtra Vidhan Sabha Elections) यांना जोडूनच दिवाळी आल्याने मतदान आणि दिवाळी सुट्टी यानिमित्त महाराष्ट्राच्या विविध भागामध्ये पर्यटकांची मोठी गर्दी पहायला मिळण्याची शक्यता आहे. रेल्वेच्या नियमांनुसार चार महिने आधी तिकीट बुकिंग सुरू केलं जातं. दरवर्षी प्रमाणे यंदाही दिवाळीच्या दिवसांत अनेक गाड्यांचं तिकीट हाऊस फुल्ल बुकिंग झालं आहे. त्यामुळे आयत्यावेळेस ट्रीपचा प्लॅन करणार्यांची गैरसोय होऊ नये म्हणून मध्य रेल्वेने नव्या गाड्यांची घोषणा केली आहे.
मध्य रेल्वेकडून दिवाळी विशेष चालवल्या जाणार्या गाड्या नागपूर ते लोकमान्य टिळक टर्मिनल्स आणि नागपूर ते सीएसएमटी अशी एक गाडी आहे. तर 8 सुविधा स्पेशल गाड्या चालवल्या जाणार आहेत.
मध्य रेल्वेच्या दिवाळी 2019 विशेष गाड्या
IRCTC App च्या मदतीने मध्य रेल्वेच्या या विशेष गाड्यांचं आरक्षण करता येणार आहे. दिवाळी दरम्यान मध्य रेल्वेच्या या विशेष गाड्या प्रवाशांच्या सोयीसाठी असल्याने त्यांचं बुकिंग लवकरात लवकर बुक करा आणि तुमची सुट्टी प्लॅन करा, रेल्वेच्या बुकिंग अॅप सोबतच Paytm, Ixigo, Make My Trip, PhonePe, Google, Ibibo, Railyatri यावरदेखील तुम्ही तिकीट बुकिंग करू शकता.