Development Of Maharashtra Agreement: महाराष्ट्राच्या विकास कामांसाठी केंद्र सरकारचा आशियाई विकास बॅंकेसोबत ३५० दशलक्षांचा करार
महाराष्ट्रातील प्रमुख आर्थिक क्षेत्रांची संपर्कक्षमता सुधारण्यासाठी केंद्र सरकारकडून 350 दशलक्ष अमेरिकी डॉलर्स करार करण्यात आला आहे.
राज्यात सहा महिन्यांपूर्वी शिंदे-फडणवीस करकार आलं आणि केंद्रात नरेंद्र तर राज्यात देवेंद्र आल्याने महाराष्ट्रातील जनतेच्या विकासाच्या अपेक्षा वाढल्या. तरी आता पर्यत मात्र मोठं असं काहीही महाराष्ट्राच्या हातात लागलेलं नाही. किंबहूना महाराष्ट्रातलेचं प्रकल्प गुजरातच्या दिशेने पळवण्यात आल्याचा प्रकार आपण गेले काही दिवसांपूर्वीच पाहिला. पण आता मात्र राज्याच्या जनतेला दिलासा देणारी बातमी आहे. महाराष्ट्रातील प्रमुख आर्थिक क्षेत्रांची संपर्कक्षमता सुधारण्यासाठी केंद्र सरकारकडून 350 दशलक्ष अमेरिकी डॉलर्स करार करण्यात आला आहे. हा प्रकल्प संपर्क क्षमता सुधारून, सेवांचा लाभ सुलभ करून आणि राज्यातील मागास जिल्ह्यांच्या सर्वसमावेशक आर्थिक विकासाला गती देऊन आंतर-प्रादेशिक असमानता दूर करण्यास मोठी मदत ठरणार आहे.
या प्रकल्पाद्वारे अहमदनगर, हिंगोली, जालना, कोल्हापूर, नागूर, नांदेड, नाशिक, पुणे, सांगली आणि सातारा, या 10 जिल्ह्यांमधील राज्य रस्त्यांचे जाळे मजबूत करण्यासाठी किमान 319 किलोमीटर लांबीचे राज्य महामार्ग आणि 149 किलोमीटर लांबीच्या जिल्ह्यांमधील रस्त्यांची हवामान आणि आपत्ती-प्रतिरोधक वैशिष्ट्यांचा समावेश करून श्रेणी सुधारणा केली जाईल. यामुळे अविकसित ग्रामीण समुदायांना बिगर-कृषी संधी आणि बाजारपेठांशी जोडायला मदत होईल, आरोग्य आणि सामाजिक सेवा सहज उपलब्ध होतील आणि लघु आणि मध्यम उद्योगांचा वाहतुकीचा खर्च कमी होऊन कृषी मूल्य साखळी सुधारेल. (हे ही वाचा:- CM Eknath Shinde Ayodhya Visit: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करणार अयोध्या दौरा, म्हणाले- अयोध्या हे त्यांच्यासाठी तीर्थक्षेत्र)
अर्थ मंत्रालयातील आर्थिक व्यवहार विभागाचे अतिरिक्त सचीव रजत कुमार मिश्रा यांनी भारत सरकारच्या वतीने, तर एडीबी च्या भारत निवासी मिशनचे प्रभारी अधिकारी हो युन जेओंग यांनी एडीबी च्या वतीने, ‘कनेक्टिंग इकॉनॉमिक क्लस्टर्स फॉर इन्क्लुझिव्ह ग्रोथ इन महाराष्ट्र या प्रकल्पावर स्वाक्षरी केली आहे. तरी हा प्रकल्प आता फक्त कागदोपत्री प्रत्येक्षात या प्रकल्पाचा भारताला नेमका काय फायदा होणार हे बघणं महत्वाचं ठरणार आहे.