गोपीचंद पडळकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल; शरद पवार यांच्याबद्द वादग्रस्त वक्तव्य केल्याचे प्रकरण

'शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेले कोरोना आहेत' असे वादग्रस्त विधान आमदार गोपीचंद पडळकर यांनी केले होते. पडळकर यांनी पंढरपूर येथे बोलताना हे विधान केले. त्यांच्या विधानानंतर राष्ट्रवादी काँग्रेस मोठ्या प्रमाणावर आक्रमक झाली. पक्षाच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्रभर आंदोलन सुरु केले आहे.

Gopichand Padalkar | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त विधानानंतर भाजप (BJP) आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बारामती शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक अध्यक्ष अमर धुमाळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन बारामती पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. बारामती पोलीस (Baramati Police Station) ठाण्याचे निरीक्षक औदुंबर पाटील यांनीही पडळकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याचे म्हटले आहे. भारतीय दंड संहिता कलम 505(2) अन्वये हा गुन्हा नोंदवीण्यात आला आहे.

'शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेले कोरोना आहेत' असे वादग्रस्त विधान आमदार गोपीचंद पडळकर यांनी केले होते. पडळकर यांनी पंढरपूर येथे बोलताना हे विधान केले. त्यांच्या विधानानंतर राष्ट्रवादी काँग्रेस मोठ्या प्रमाणावर आक्रमक झाली. पक्षाच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्रभर आंदोलन सुरु केले आहे. (हेही वाचा, 'शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेले कोरोना' भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांची जहरी टीका)

दरम्यान, आमदार गोपीचंद पडळकर यांनी केले विधान ही त्यांचे व्यक्तिगत विधान आहे. पक्षाशी त्याचा कोणताही संबंध नाही. शरद पवार आमचे राजकीय विरोधक आहेत. ते आमचे शत्रू नाहीत. त्यामुळे पवार यांच्याबद्दल कोणीही अशा प्रकारचे विधान करणे चुकीचे आहे, असे म्हणत भाजपनेही पडळकर यांच्या विधानापासून हात झटकले आहेत.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्रभर आक्रमक झाल्यानंतर पोलिसांनी गोपीचंत पडळकर यांच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्त लावला आहे. आटपाडी तालुक्यातील झरे परिसरात गोपीचंद पडळकर यांचे घर आहे. या घराबाहेर पोलीस कर्मचारी उभे आहेत. महाराष्ट्रातील विवध ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून पडळकर यांच्या फोटोला जोडेमारो आंदोलनही केले जात आहे.

Share Now
Advertisement


संबंधित बातम्या

Sharad Pawar Criticizes Sanjay Raut: 'ऑपरेशन सिंदूर'; संजय राऊत यांच्या विधानावर शरद पवार यांना टोला, म्हणाले 'देशाच्या मुद्द्यावर स्थानिक राजकारण नको'

Police Constable Rapes Married Woman: नाशिकमध्ये पोलीस कॉन्स्टेबलचा विवाहित महिलेवर बलात्कार; पीडितेला जीवे मारण्याची धमकी, आरोपीला अटक

Mumbai Cybercrime Cases: सोशल मीडिया घोटाळ्यांचा मुंबईतील तरुणांना फटका; स्नॅपचॅटवर 11 वर्षांच्या मुलीला केले ब्लॅकमेल, कॉलेज विद्यार्थ्याने इंस्टाग्रामवर गमावले 2.74 लाख रुपये

Digital Lounge At Mumbai Central Station: मुंबई सेंट्रल स्टेशनवर सुरु झाले भारतीय रेल्वेचे देशातील पहिले डिजिटल लाउंज; मिळणार स्थानकावर बसून काम करण्यासाठी Co-Working जागा, जाणून घ्या वैशिष्ठ्ये

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement