Mumbai-Goa Highway Accident: मुंबई गोवा महामार्गावर कार-ट्रकमध्ये समोरासमोर धडक; 9 ठार, 4 वर्षांचे मूल थोडक्यात बचावले

ही घटना रायगड (Raigad) येथील रेपोली गावाजवळ गुरुवारी (19 जानेवारी) पहाटे घडली. कार आणि ट्रक यांची समोरासमोर धडक झाल्याने ही घटना घडली. मृतांमध्ये 4 महिला आणि 5 पुरुषांचा समावेश आहे.

Mumbai-Goa Highway Accident | (Photo Credits: ANI)

मुंबई गोवा महामार्गावर (Mumbai-Goa Highway) झालेल्या भीषण अपघातात (Accident) 9 जण ठार झाले आहेत. ही घटना रायगड (Raigad) येथील रेपोली गावाजवळ गुरुवारी (19 जानेवारी) पहाटे घडली. कार आणि ट्रक यांची समोरासमोर धडक झाल्याने ही घटना घडली. मृतांमध्ये 4 महिला आणि 5 पुरुषांचा समावेश आहे. धक्कायक म्हणजे अपघातात 4 वर्षांचे मूल आश्चर्यकारकरित्या बचावले. त्याला दुखापत झाली असून, त्याच्यावर माणगाव येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

स्थानिकांनी माहिती देताना सांगितले की, अपघात (Accident News) इतका भीषण होता की, अपघाताच्या आवाजाने परिसर हादरुण गेला. घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी मदत आणि बचाव कार्य सुरु केले. पोलिसांनाही माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान, काही कारणामुळे वाहतूक विस्कळीत (Trafic Jam) झाली. काही काळ वाहतुकीचा खोळंबाही झाला. पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने बाजूला केली. त्यानंतर वाहतूक पूर्ववत झाली.

ट्विट

ट्रक चालकाचे आपल्या वाहनावरील नियंत्रण सुटल्याने त्याने विरुद्ध दिशेने येणाऱ्या कारला थेट धडक दिली आणि हा अपघात घडला असे सांगितले जात आहे. गोरेगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. अपघातात इको कारचा चक्काचूर झाला.



संबंधित बातम्या