CAA & NRC: फर्ग्युसन कॉलेज येथे नागरिकत्व दुरुस्ती कायदा विरोधी स्वाक्षरी मोहीम आयोजित केलेल्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी धाडली नोटीस
मात्र या विद्यार्थ्यांना ही मोहीम न करण्याचे सूचित करत पुणे पोलिसांकडून एक नोटीस बजवण्यात आली आहे.
पुणे : नागरिकत्व दुरुस्ती कायद्यांनंतर (Citizenshiop Amendment Act) देशभरात सुरु असणाऱ्या आंदोलन, निदर्शनांचे पडसाद महाराष्ट्रात (Maharashtra) देखील दिसून येऊ लागले आहेत. आज सकाळी या कायद्याला विरोध करण्यासाठी पुणे येथील फर्ग्युसन कॉलेजच्या (Fergsan College) काही विद्यार्थ्यांनी स्वाक्षरी मोहिमेचे आयोजन केले होते. मात्र या विद्यार्थ्यांना ही मोहीम न करण्याचे सूचित करत पुणे पोलिसांकडून एक नोटीस बजवण्यात आली आहे. या 2 विद्यार्थ्यांना ही नोटीस CRPC कलम 149 अंतर्गत पाठवण्यात आली आहे. (CAA Protest: नागरिकत्व कायद्याविरूद्ध देशभर आंदोलन कायम; सर्वोच्च न्यायालयात आज होणार सुनावणी)
प्राप्त माहितीनुसार, पोलिसांच्या सूचनेनुसार ही मोहित स्थगित करण्यात आली आहे. तर, विद्यार्थ्यांना शांततापूर्ण निषेध नोंदवण्यास देखील मनाई केल्याने विद्यार्थ्यांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. CAA and NRC: सोनिया गांधी यांचं गृहमंत्री अमित शाह यांना जाहीर आव्हान, 'हिंमत असेल तर इशान्य भारतात जाऊन दाखवा'.
ANI ट्विट
दरम्यान, महाराष्ट्रातील राजकीय पक्षांनी याबाबत कोणतीही ठोस भूमिका अद्याप घेतलेली नाही. आज सकाळी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी या विषयी मौन सोडून प्रतिक्रिया देताना नागरिकत्त्व सुधारणा कायदा लागू करण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे येत्या कॅबिनेट बैठकीत निर्णय घेतील असं म्हटलं आहे.