Nagpur Bus Stuck on Railway Track: रुळ क्रॉस करताना बस अडकली, मोटारमॅनच्या मदतीने 40 विद्यार्थ्यांची सुटका

रुळ ओलांडत असताना ही घटना घडली. मात्र, सुदैवाने मोटरमॅनच्या सतर्कामुळे ट्रेन थांबवली. त्यामुळे ४० विद्यार्थ्यांचे प्राण वाचले आहे. ही घटना काल दुपारी चारच्या सुमारास घडली.

nagpur bus stuck pC TW

Nagpur Bus Stuck on Railway Track: नागपूरमधील खापरखेडा येथील रुळावर बस अडकल्याची मोठी घटना घडली. रुळ क्रॉस करत असताना ही घटना घडली. मात्र, सुदैवाने मोटरमॅनच्या सतर्कामुळे ट्रेन थांबवली. त्यामुळे ४० विद्यार्थ्यांचे प्राण वाचले आहे. ही घटना काल दुपारी चारच्या सुमारास घडली. घटनास्थळी नागरिकांनी गर्दी केली होती. (हेही वाचा- लखनऊ आग्रा महामार्गावर बसचा अपघात, दोन जण ठार, अनेक जखमी)

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना नागपूर शहरातील खापरखेडा रेल्वेरुळ क्रॉसिंग करत असताना घडली. विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी बस रेल्वे रुळ क्रॉसिंग करत असताना अचानक रेल्वे रुळातील गेट अचानक बंद झाला. त्यामुळे बस रुळावर अडकून पडली. त्यामुळे सर्वांनाच घाम फुटला. या घटनेनंतर विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.

रेल्वे रुळावर अचानक गेट बंद झाल्यामुळे ही घटना घडली. पण पुढे काही वेळातच ट्रेन येणार होती. त्यामुळे नागरिकांनी आणि मोटरमॅनच्या साहाय्याने ट्रेन कशीबशी थांबवण्यात आली. रेल्वे चालकाने धोक्याचा इशारा ओळखत ट्रेन थांबवली. त्यामुळे चालकासह विद्यार्थ्यांचे प्राण वाचले. रेल्वे रुळाजवळ नागरिकांनी गर्दी केली होती. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. बसमधील विद्यार्थ्यांची सुखरुप सुटका झाल्याने सर्वांनी मोटारमॅनचे कौतुक केले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.