Burglary at Mobile Shop in Panvel: पनवेल मध्ये शिक्षणाच्या खर्चासाठी 20 वर्षीय तरूणाने चोरले 24 लाख किंमतीचे मोबाईल फोन्स; घटना सीसीटीव्हीत कैद (Watch Video)
इंजिनियरिंगच्या शेवटच्या वर्षाला असलेल्या मुलाने ही चोरी शिक्षणाच्या खर्चासाठी केली आहे.
पनवेल (Panvel) मध्ये शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी एका तरूणाने चक्क गुन्हेगारीचा मार्ग निवडला असल्याचं समोर आलं आहे. कॉलेजची फी भरण्यासाठी त्याने एका मोबाईल दुकानामध्ये चोरी केल्याचं समोर आलं आहे. मोबाईल दुकानामध्ये असलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्यामध्ये हा प्रकार कैद झाला आहे. पोलिसांनी तरूणाला अटक केल्यानंतर त्याने चोरी मागील त्याचा उद्देश सांगितला.
मोबाईलच्या दुकानात चोरी करणारा मुलगा हा 20 वर्षीय गरजू तरूण आहे. त्याने दुकानाचं शटर तोडून तेथून 24 लाख किंमतीचे मोबाईल फोन लंपास केले. 55 महागड्या मोबाईल फोन्सची चोरी झाल्यानंतर दुकानाच्या मालकाने पोलिसांत तक्रार केली आहे. Digital Arrest: 'डिजिटल अटक'च्या बहाण्याने आयआयटी-बॉम्बेच्या विद्यार्थ्याची 7 लाखांची फसवणूक .
पनवेल मधील मोबाईल फोनच्या दुकानातील चोरी
पोलिसांनी सीसीटीव्ही फूटेज वरून तरूणाचा पत्ता शोधला.यामध्ये आरोपी मुलगा इंजिनियरिंगच्या शेवटच्या वर्षाचा असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी चौकशी केली तेव्हा कॉलेज मध्ये फी भरण्यासाठी पैसे नसल्याने ही चोरी केल्याचं तो म्हणाला आहे. पोलिसांनी आरोपेऐ मुलाला कोर्टात सादर केले तेव्हा कोर्टाने त्याला 2 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.