Buldhana Hair Loss Cases: बुलढाण्यातील केस गळतीचे गूढ उकलले; पंजाब आणि हरियाणामधून आलेल्या गव्हातील सेलेनियमचे उच्च प्रमाण ठरले कारण- Reports

डिसेंबर 2024 ते या वर्षी जानेवारी दरम्यान बुलढाण्यातील 18 गावांमध्ये 279 व्यक्तींमध्ये अचानक केस गळणे किंवा 'अ‍ॅक्युट ऑनसेट अलोपेशिया टोटालिस'ची प्रकरणे नोंदवली गेली, ज्यामुळे अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले. या आजारामुळे बाधित व्यक्तींना, ज्यांपैकी बरेच जण महाविद्यालयीन विद्यार्थी आणि तरुणी होते, त्यांना मोठ्या सामाजिक आव्हानांचा सामना करावा लागला.

Wheat (Credits: Pixabay)

काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यातील काही गावांमध्ये अचानक केस गळतीची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. या प्रकरणांचा अभ्यास केल्यानंतर, सरकारी रेशन दुकानांमधून पुरवठा होणाऱ्या पंजाब आणि हरियाणा येथून आलेल्या गव्हामध्ये, अत्यधिक प्रमाणात सेलेनियम (Selenium) आढळले आहे, ज्यामुळे 'सेलेनोसिस' नावाच्या स्थितीमुळे केस गळती होत असल्याचे निष्पन्न झाले आहे. सेलेनियम हे मातीत आढळणारे एक खनिज आहे आणि ते नैसर्गिकरित्या पाण्यात आणि काही पदार्थांमध्ये आढळते. लोकांना सेलेनियमची खूप कमी प्रमाणात आवश्यकता असते, जी चयापचयात महत्त्वाची भूमिका बजावते.

डिसेंबर 2024 ते या वर्षी जानेवारी दरम्यान बुलढाण्यातील 18 गावांमध्ये 279 व्यक्तींमध्ये अचानक केस गळणे किंवा 'अ‍ॅक्युट ऑनसेट अलोपेशिया टोटालिस'ची प्रकरणे नोंदवली गेली, ज्यामुळे अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले. या आजारामुळे बाधित व्यक्तींना, ज्यांपैकी बरेच जण महाविद्यालयीन विद्यार्थी आणि तरुणी होते, त्यांना मोठ्या सामाजिक आव्हानांचा सामना करावा लागला, ज्यामध्ये शैक्षणिक उपक्रमांमध्ये व्यत्यय आणि लग्न जुलावान्याद अडचण यांचा समावेश होता.

रायगडमधील बावस्कर हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरचे एमडी डॉ. हिंमतराव बावस्कर यांनी पीटीआयला सांगितले की, बाधित भागात पोहोचल्यानंतर आणि नमुने गोळा केल्यानंतर, असे आढळून आले की, व्यक्तींमध्ये, प्रामुख्याने तरुणींमध्ये, डोकेदुखी, ताप, टाळूला खाज सुटणे, मुंग्या येणे आणि काही प्रकरणांमध्ये उलट्या कमी हालचाल अशी लक्षणे होती. या प्रादुर्भावाचे मुख्य कारण पंजाब आणि हरियाणा येथून आयात केलेल्या गहूशी जोडलेले होते, ज्यामध्ये स्थानिक पातळीवर उत्पादित होणाऱ्या गव्हाच्या तुलनेत सेलेनियमचे प्रमाण लक्षणीयरीत्या जास्त असल्याचे आढळून आले.

ते पुढे म्हणाले, ‘प्रभावित प्रदेशातील गव्हाच्या आमच्या विश्लेषणातून असे दिसून आले की, स्थानिक पातळीवर पिकवल्या जाणाऱ्या गव्हाच्या तुलनेत त्यात 600 पट जास्त सेलेनियम आहे. सेलेनियमचे हे उच्च सेवन हे अलोपेसियाच्या प्रकरणांचे कारण असल्याचे मानले जाते.’ ही स्थिती झपाट्याने विकसित झाली आणि या गावांमध्ये लक्षणे दिसू लागल्यानंतर तीन ते चार दिवसांत संपूर्ण टक्कल पडण्याची समस्या निर्माण झाली, असे वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले. तपासणीत बाधित व्यक्तींच्या रक्त, मूत्र आणि केसांमध्ये सेलेनियमच्या पातळीत लक्षणीय वाढ आढळून आली.

रक्त, मूत्र आणि केसांच्या नमुन्यांमध्ये सेलेनियमचे प्रमाण अनुक्रमे 35 पट, 60 पट आणि 150 पट वाढल्याचे दिसून आले. यावरून असे दिसून येते की जास्त प्रमाणात सेलेनियमचे सेवन हा साथीच्या आजाराला थेट कारणीभूत आहे. टीमला असेही आढळून आले की, बाधित व्यक्तींमध्ये झिंकचे प्रमाण लक्षणीयरीत्या कमी होते, जे जास्त सेलेनियममुळे होणाऱ्या संभाव्य असंतुलनाकडे लक्ष वेधते. गव्हाच्या पुढील तपासणीत असे दिसून आले की, सेलेनियमचे प्रमाण बाह्य दूषिततेचा परिणाम नव्हते तर ते धान्यातच अंतर्निहित होते. पंजाब आणि हरियाणा येथील गव्हात सेलेनियमची जैवउपलब्धता जास्त असल्याचे ज्ञात आहे. परिसरातील रेशन दुकानांमधून घेतलेल्या गव्हाच्या नमुन्यांमध्ये इतर कोणतेही लक्षणीय दूषित पदार्थ आढळले नाहीत. (हेही वाचा: Buldhana Vision impairment: केस गळणे, टक्कल पडणे यातून सावरताच दृष्टीदोष उद्भवला; बुलढाणा जिल्ह्यात नागरिकांपुढे आरोग्य समस्या)

बावस्कर यांनी त्यांच्या अहवालात म्हटले आहे की, ज्या भागात हा प्रादुर्भाव झाला तो प्रदेश खारट, क्षारीय माती आणि वारंवार येणाऱ्या दुष्काळासाठी ओळखला जातो, ज्यामुळे कृषी उत्पादकतेवर परिणाम झाला आहे. अनेक कुटुंबे रेशन दुकानांमधून मिळणाऱ्या सरकारी अनुदानित गव्हावर अवलंबून असतात, ज्यांच्या गुणवत्तेचे नियमन योग्य प्रकारे केले जात नाही. प्रभावित गावांना पुरवण्यात आलेला गहू हा उच्च सेलेनियम सामग्री असलेल्या प्रदेशांमधून आणण्यात आला होता, ज्यामुळे आरोग्य संकटात भर पडली. या साथीमुळे अन्न पुरवठ्याचे कडक नियमन करण्याची गरज अधोरेखित होते, विशेषतः ज्या भागात रहिवासी सरकारकडून पुरवल्या जाणाऱ्या रेशनवर अवलंबून असतात. दरम्यान, प्रतिबंधात्मक उपाय म्हणून अधिकाऱ्यांनी लोकांना सेलेनियमयुक्त गव्हाचे सेवन थांबवण्यास सांगितले, त्यानंतर काही लोकांनी 5-6 आठवड्यांत केसांची अंशतः वाढ झाल्याचे नोंदवले आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now