Buldhana Accident News: बुलढाण्यात भरधाव ट्रॅव्हल्सचा दुचाकीला धडक, भीषण अपघातात तिघांचा मृत्यू

बुलढाणा जिल्ह्यात दुचाकीचा भीषण अपघात झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

Accident (PC - File Photo)

Buldhana Accident News: बुलढाणा जिल्ह्यात दुचाकीचा भीषण अपघात झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. भरधाव वेगात असणाऱ्या ट्रॅव्हल्सने दुचाकीला धडक दिल्याची माहिती समोर आली आहे. या भीषण अपघातात तीन जणांना मृत्यू झाला आहे. ही घटना ऐन दिवाळीच्या भाऊबीज सणाला झाली आहे. बुधवारी 12 वाजण्याच्या सुमारास नॅशनल हायवे क्रमांक ६ वरील वडनेर गावाजवळ घडली आहे. या घटनेमुळे गावात मोठी खळबळ उडाली आहे. घटनेअंतर्गत पोलिसांचा तपास सुरु आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दुचाकीवरून तिघे जण बुधवारी रात्री १२ वाजता नॅशनल हायवे क्रमांक ६ येथून जात होते. दरम्यान मलकापूर येथून नांदूराच्या दिशेने जाणारी भरधाव ट्रॅव्हल्स येत होती. वडनेर गावाजवळ येताच ट्रॅव्हल्सचा वेग वाढला आणि दुचाकीला जोरदार धडक दिली. त्यामुळे भीषण अपघात झाला. अपघातात तिघांना ही गंभीर जखमा झाल्या आणि तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

स्वप्निल करणकर (27) गोपाळ राणे, (३४) आकाश आखाडे असं मृतांची नावे आहे. अपघात झाल्यावर स्थानिकांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी अपघातस्थळी येऊन तिघांचे मृतदेह ताब्यात घेतले. पोलिसांनी मृतांच्या नातेवाईकांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर मृतांना मलकापूर शासकिय रुग्णालायात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले. पोलिसांनी ट्रॅव्हल्सच्या चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिस या घटनेचा अधिक तपासात आहे.