Buffalo Breeding: गुणसूत्र विर्यकांड्या वापरून कृत्रिम रेतन, गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा येथे आता फक्त गाई, म्हशीच जन्मणार
हे वातावरण गोंदिया जिल्ह्यात नक्कीच आहे.
गोंदिया (Gondia) जिल्ह्यातील तिरोडा (Tirora) येथे आता केवळ दुग्धोत्पादनच वाढणार नाही तर त्यासोबत पशुधनही वाढणार आहे. विशेष म्हणजे आता या ठिकाणी प्रामुख्याने गाई (Cows) आणि म्हैशीच (Buffaloes) जन्म घेतील. होय, अनेकांना आश्चर्य वाटणे शक्य आहे. पण ह वास्तव आहे. येथील शेतकरी आणि पशुपालन करणाऱ्या व्यवसायिकांनी आता गाई, म्हशींची पैदास करताना केवळ मादीच होण्याचे गुणसूत्र विर्यकांड्या वापरून (Sex Sorted Semen) कृत्रिम रेतन तंत्र सुरु केले आहे. हे तंत्र वापरल्यास गाईंमध्ये कालवड, म्हशींमध्ये वगार मादीच जन्म देण्याची हमी 90 टक्क्यांपेक्षा अधिक असते. अदानी फाउंडेशन हे तंत्र येथील शेतकऱ्यांना पुरवत आहे. अभ्यासकही सांगतात की अशा प्रकारचे रेतन करुन उत्पन्न घेण्यासाठी भौगोलिक वातावरण अतिशय महत्त्वाचे ठरते. हे वातावरण गोंदिया जिल्ह्यात नक्कीच आहे.
प्राप्त माहितीनुसार, जिल्ह्यात दोन पशुधन विकास केंद्र (LDC) आहेत. ही केंद्र आजुबाजूच्या 26 गावांमध्ये सेवा देतात. त्यातून प्रतिदिन सुमारे 10762.5 लिटर दूध उत्पादन होते. इतके दूध सुमारे 7 हजार 60 दुभत्या जनावरांपासून मिळते. त्याचा परिणाम तालुक्यातील दुग्धोत्पादन वाढण्यात झाला आहे. पण, या उत्पन्नाच्या वाढीचा वेग अधिक गतीमान होण्यासाठी मादींची पैदास होणे अतिशय महत्त्वाचे आहे. (हेही वाचा, Buffalo Breeding: काय सांगता? म्हैस माजावर येत नाही? असा ओळखा म्हशीचा माज)
आजघडीला या ठिकाणी गायी-म्हैशींमध्ये नर आणि मादींची पैसास ही जवळपास समसमान म्हणजेच 50-50 टक्के आहे. यातील नरांचे प्रमाण कमी करुन मादी जन्माचे प्रमाण 90% इतके वाढविण्यासाठी पशुसंवर्धन व संबंधित उपक्रम (कामधेनू) पशुधन विकास केंद्राची स्थापना करण्यात आली आह. या केंद्राच्या माध्यमातून अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरत सॉर्टेड सेक्स सिमन कृत्रिम रेतन (Sorted Sex Semen Artificial Insemination) सुरु करण्यात आले आहे. सॉर्टेड सिमेन म्हणजे प्रक्रिया केलेल्या गुणसूत्र विर्यकांड्या आहेत. याचा वापर करुन गायी, म्हैशींना गाभ घालवल्यास नर जन्माचे प्रमाण बरेच कमी होते. तसेच, मादी जन्माचे प्रमाण जवळपास 90 टक्के इतके वाढू शकते, असा दावा अदानी फाउंडेशन करते.