Buddha Purnima 2020: पंतप्रधान नरेद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून गौतम बुद्ध यांना ट्विटरद्वारे वंदन

नागरिकांना गर्दी करण्यास मनाई आहे. गर्दी टाळून कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी विविध सण, उत्सव आणि सर्वच सार्वजनिक कार्यक्रम टाळण्यावरच राज्य आणि देशाचा भर राहिला आहे. परिणामी बुद्ध पौर्णिमेच्या कार्यक्रमांवरही मर्यादा आल्या आहेत.

Buddha Purnima 2020 | (Photo credit: archived, edited, symbolic images)

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी देशातील आणि राज्यातील जनतेला बुद्ध पौर्णिमेच्या (Buddha Purnima 2020) शुभेच्छा दिल्या आहेत. दोन्ही नेत्यांनी ट्विटरच्या माध्यमातून जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. बौद्ध पौर्णिमेनिमित्त महाराष्ट्रासह देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. मात्र, या वेळी कोरोना व्हायरस संकटाची पार्श्वभूमी विचारात घेता संबंध देशभर लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. नागरिकांना गर्दी करण्यास मनाई आहे. गर्दी टाळून कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी विविध सण, उत्सव आणि सर्वच सार्वजनिक कार्यक्रम टाळण्यावरच राज्य आणि देशाचा भर राहिला आहे. परिणामी बुद्ध पौर्णिमेच्या कार्यक्रमांवरही मर्यादा आल्या आहेत.

जनतेला बौद्ध पोर्णिमेच्या शुभेच्छा देताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, ''तथागत गौतम बुद्धांनी जगाला शांती, अहिंसा, समतेचा मार्ग दाखवला. आजच्या बुद्ध पौर्णिमेला तथागत बुद्धांच्या आयुष्यात महत्त्वाचे स्थान आहे. तथागतांना जगाच्या दुःखाच्या मुळाचे व ते दूर करण्याचे ज्ञान प्राप्त झाले.मानवी जीवनाच्या उत्थानासाठी तथागत बुद्धांनी ध्यान मार्ग व तपश्चर्या केली''

मुख्यमंत्री ट्विट

मुख्यमंत्र्यानी आपल्या पुढच्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, ''त्यांच्या संबोधी– ज्ञानाची आज जगाला नितांत गरज आहे. बुद्धांची शिकवण अनुसरण्यातूनच आपण आज निर्माण झालेल्या मोठ्या संकटावरही मात करण्याची प्रेरणा घेऊ शकतो. त्यासाठी बुद्ध जयंतीच्या शुभेच्छा आणि तथागत बुद्धांना त्रिवार वंदन!'', अशा शब्दात गौतम बुद्धांना वंदन करुन ठाकरे यांनी जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. (हेही वाचा,Buddha Purnima 2020: बुद्ध पौर्णिमे दिवशी जाणून घ्या भगवान गौतम बुद्ध यांच्याबद्दल डॉ. बाबासाहेब आंबेडकर, संत तुकडोजी महाराज ते ओशो यांचे काय होते विचार )

पंतप्रधान ट्विट

पंतप्रधान ट्विट

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, गौतम बुद्ध हे बोध आणि भारताचा आत्मबोध या दोन्हीचे प्रतिक आहे. या आत्मबोधासोबतच भारत संपूर्ण मानवतेसाठी निरंतर विश्वहितासाठी काम करेत आहे आणि करत राहील. भारताची प्रगती ही जगाच्या प्रगतीसाठी सहाय्यक ठरेन.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif