BRS Supremo KCR Nanded Sabha: के. चंद्रशेखर राव यांची आज महाराष्ट्रात सभा; शंकर अण्णा धोंडगे यांच्यासह अनेकांचा बीआरएस प्रवेश होण्याची शक्यता

त्यांनी नुकताच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला होता. शंकर अण्णा धोंडगे यांच्यासोबतच आदिवासी नेते नागनाथ घिसेवाड, दलित नेते सुरेश दादा गायकवाड आणि वंचित आघाडीचे यशपाल भिंगे (Yashpal Binghe) हे देखील बीएसआर पक्षात प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा आहे.

K. Chandrashekar Rao | (Photo Credits: Facebook)

तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री आणि बीआरएस सर्वेसर्वा के चंद्रशेखर राव ( K. Chandrashekar Rao) यांची महाराष्ट्रात दुसरी सभा आज नांदेड (K. Chandrashekar Rao Public Meeting in Nanded) जिल्ह्यातील लोहा येथे पार पडते आहे. बीआरएस (BRS) म्हणजेच भारत राष्ट्र समिती (Bharat Rashtra Samithi) हा पक्ष पाठिमागील काही काळापासून महाराष्ट्रात चंचूप्रवेश करण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्याचाच भाग म्हणून तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री आणि बीआरएस सर्वेसर्वा के चंद्रशेखर राव महाराष्ट्रात दौरे काढत आहेत. या आधीही राव यांची महाराष्ट्रात सभा पार पडली आहे. दरम्यान, आजच्या सभेचे वैशिष्ट्य म्हणजे नांदेड जिल्ह्यातील अनेक महत्त्वाचे नेते बीआरएस पक्षात प्रवेश करणार असल्याचे वृत्त आहे.

प्रामुख्याने शेतकरी चळवळीचे नेते शंकर अण्णा धोंडगे (Shankar Anna Dhondge) हे बीआरएसमध्ये प्रवेश करणार असल्याचे समजते. त्यांनी नुकताच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला होता. शंकर अण्णा धोंडगे यांच्यासोबतच आदिवासी नेते नागनाथ घिसेवाड, दलित नेते सुरेश दादा गायकवाड आणि वंचित आघाडीचे यशपाल भिंगे (Yashpal Binghe) हे देखील बीएसआर पक्षात प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा आहे. आपल्या सर्व समर्थकांसह हा पक्ष प्रवेश होणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे नांदेड जिल्ह्यातील या पक्षप्रवेशांकडे जिल्ह्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष तर लागून राहिलेच आहे. पण, त्यासोबत राज्यातील राजकीय वर्तुळातही चर्चा सुरु आहे. (हेही वाचा, K. Chandrashekar Rao in Maharashtra: के चंद्रशेखर राव यांची महाराष्ट्रात मोर्चेबांधणी; नांदेड येथील मोंढा मैदानावर 5 फेब्रुवारी रोजी जाहीर सभेचे आयोजन)

के चंद्रशेखर राव

के. चंद्रशेखर राव यांना KCR म्हणूनही ओळखले जाते. तेलंगणा राज्यातील प्रादेशिक राजकीय पक्ष, तेलंगणा राष्ट्र समिती (TRS) चे संस्थापक आणि अध्यक्ष असलेले केसीआर तेलंगणा राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री आहेत. केसीआर यांचा जन्म 17 फेब्रुवारी 1954 रोजी तेलंगणातील सिद्धीपेट जिल्ह्यातील चिंतामडाका गावात झाला. त्यांनी त्यांचे शालेय शिक्षण सिद्धीपेट येथे पूर्ण केले आणि नंतर हैदराबादमधील उस्मानिया विद्यापीठातून कला शाखेची पदवी प्राप्त केली.

केसीआर यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात तेलुगु देसम पार्टी (टीडीपी) चे सदस्य म्हणून केली होती. परंतु नंतर तेलंगणाचे वेगळे राज्य प्राप्त करण्याच्या उद्देशाने 2001 मध्ये टीआरएसची स्थापना केली आणि ते वेगळे झाले. त्यांनी तेलंगणाच्या निर्मितीसाठी चळवळीचे नेतृत्व केले आणि 2014 मध्ये राज्याच्या निर्मितीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली.

तेलंगणा राज्याच्या स्थापनेपासून केसीआर हे तेलंगणाचे मुख्यमंत्री आहेत. त्यांना विविध कल्याणकारी योजना आणि शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य करणाऱ्या प्रमुख "रयथू बंधू" योजनेसह राज्यात विकासात्मक उपक्रम राबविण्याचे श्रेय दिले जाते.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif