Bhandara Mobile blast: भंडारा जिल्ह्यात मोबाईल स्फोट झाल्याने 12 वर्षीय मुलगा जखमी

भंडारा जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना घडली आहे. मोबाईलचा धूर येताच स्फोट झाला, या घटनेत १२ वर्षाय मुलगा जखमी झाला.

Mobile Blast (PC - File Photo)

Bhandara Mobile blast: भंडारा (Bhandara) जिल्हात मोबाईल स्फोट झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अचानक बिघाड झाल्याने स्फोट झाल्याची माहिती मिळाली आहे. भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील हनुमान मंदिर परिसरात ही घटना घडली आहे. मोबाईलचा स्फोट झाल्याने 12 वर्षाय मुलगा जखमी झाला आहे.  प्रीतम किशोर वाघ असं जखमी झालेल्या मुलाचे नाव आहे. सद्या त्याचावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मुलाने योग्यवेळी सतर्कता दाखवली त्यामुळे जीवीतहानी टळली आहे.

सुत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार, रविवारी शाळेला सुट्टी असल्यामुळे प्रीतम वडिलांच्या दुकानात जायचं ठरवलं. दुकानात जात असताना वडिलांचा विवो कंपनीचा फोन खिशात ठेवला. काही काळी नंतर त्या खिशातून धुर येत असल्याच त्याला समजलं. काही तरी विचित्र घडत असल्याचे त्याच्या लक्षात येताच त्याने फोन खिशातून बाहेर काढला. आणि तातडीने फोन फेकला.  फोन बाहेर काढताच त्याच्या स्फोट झाला.

मोबाईल बाहेर काढल्यानंतर त्याचा स्फोट झाला त्यामुळे प्रीतमचे जीव वाचले. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. स्थानिकांच्या मदतीने प्रीतमला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मोठं संकट टळल्याचे दिसून येत आहे. गेल्या महिन्यात देखील औरंगाबाद येथे अशीच घटना घडली.

 

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement