Aurangabad News: शेअर बाजारातून कर्जबाजारी झाला, डोक्यावर ताण आणि नैराश्यातून टोकाचे पाऊल उचलले, औरंगाबाद येथील घटनेमुळे खळबळ

आत्महत्या करण्यापूर्वी गणेश याने 'बाबा, मला माफ करा, मी तुमचे पैसे गमावले' अशी सुसाईड नोट लिहून ठेवली आहे.

Suicide | Image Used For Representative Purpose | (Photo Credits: unsplash.com)

Aurangabad News: औरंगाबाद (Aurangabad) येथील एका अभियंताने वयाच्या 35 व्या वर्षी  आत्महत्या करून जीवन संपवले आहे. शेअर बाजारामध्ये (Share market) गुंतवणुक करून डोक्यावर भरपूर प्रमाणात कर्जबाजारी असल्यामुळे टोकाचे पाऊल उचलेले आहे.  या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पडेगाव भागातील तारांगण सोसायटीत ही घटना घडली आहे. स्थानिकांना कळताच पोलीसांच खबर दिली. पोलीसांना तपासा दरम्यान घराच मृतदेहाजवळ सुसाईट नोट सापडली. साडीच्या मदतीने त्यांने गळ्याला गळफास लावला आणि आत्महत्या केली.

गणेश श्रीहरी चव्हाण असं या मृताचे नाव आहे. आत्महत्या करण्यापुर्वी त्यांने सुसाइट नोट लिहली.  बाबा मला माफ करा, मी तुमचे पैसे गमावले असं चिठ्ठी लिहलेली घरात सापडली. या नैराश्यातून त्यांने आयुष्य संपवण्यासाठी पाऊल उचलेले. घरात कोणीही नसताना त्याने साडीच्या मदतीने गळफास लावून घेतला.  शेअर बाजारात वडिलांचे पैसे गमावल्यामुळे त्याला भरपूर ताण आला. बऱ्यांच दिवसांपासून तो शेअर बाजाराता गुंतवणुक करत होतो.

बायको आणि मुलगा माहेरी गेले होते. बायकोने अनेकदा फोन लावला त्याने फोन उचलला नाही म्हणून शेजारच्यांशी संपर्क करत तीने शेजारच्यांना कानावर घातले. शेजारच्यांनी घरात डोकावून पाहील्यावर गणेश लटकलेल्या अवस्थेत दिसला. ताबडतोब छावणी पोलीसांना कळवण्यात आले. पोलीसांनी तपास करताच सुसाईट नोट ताब्यात घेतली. आणि या प्रकरणात पोलीस ठाण्यात नोंद घेतली.  कर्जबाजारी असल्यामुळे त्याने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.

 

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now