Bhima Koregaon Case: मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळला सुधा भारद्वाज, अरुण फरेरा, वर्णन गोन्साल्विस यांचा जामीन
न्यायालयाने 7 ऑक्टोबर पर्यंत आपला आदेश राखीव ठेवला आहे.
बॉम्बे हायकोर्टाने (Bombay HC) आज (15 ऑक्टोबर) भीमा कोरेगांव हिंसा प्रकरणामध्ये (Bhima Koregaon) कार्यकर्ते सुधा भारद्वाज (Sudha Bhardwaj), अरुण फरेरा (Arun Ferrira) आणि वर्णन गोन्साल्विस (Vernon Gonsalves) ला जामीन देण्यास नकार दिला आहे.या तिघांवरही माओवाद्यांसोबत संबंध असल्याचे आरोप आहेत. न्यायमूर्ती सारंग कोतवाल यांच्या एक न्यायाधीश खंडपीठासमोर 27 ऑगस्टपासून नियमित या तिघांच्या जामिनावर सुनावणी सुरू आहे. न्यायालयाने 7 ऑक्टोबर पर्यंत आपला आदेश राखीव ठेवला आहे. Bhima Koregaon case: सुधा भारद्वाज, वरावरा राव यांच्यासह इतरांवर तब्बल 1,837 पानांचे आरोपपत्र.
ANI Tweet
कोरेगाव भीमा लढाईच्या विजयाला 200 वर्षे पूर्ण झाल्याच्या स्मृतिप्रित्यार्थ 1 जानेवारी 2018 दिवशी पुणे येथे एल्गार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेच्या आयोजनानंतर कोरेगाव भीमा येथे हिंसाचार घडला होता. तसेच, हा हिंसाचार घडवून आणण्यामागे माओवाद्यांचा हात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. पुणे पोलिसांनी आरोपींवर 1,837 पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे.