Bomb Threat to Delhi-Mumbai Akasa Air Flight: दिल्ली मुंबई अकासा एअर फ्लाईट मध्ये बॉम्ब च्या धमकीने खळबळ; अहमदाबाद विमानतळवरावर आपत्कालीन लॅन्डिंग

विमानसेवेच्या नियमावलीनुसार, दिल्ली मुंबई विमान अलर्ट मिळाल्यानंतर नजिकच्या अहमदाबाद विमानतळावर उतरवण्यात आलं. सारे प्रवासी सुखरूप आहेत.

Flight | Representational image (Photo Credits: pxhere)

दिल्ली (Delhi) वरून मुंबई (Mumbai) ला येणारे Akasa Air flight आज सकाळी अहमदाबाद विमानतळावर डायव्हरर्ट करण्यात आले आहे. सुरक्षेच्या कारणास्तव हे विमान वळवण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. QP 1719 हे दिल्ली मुंबई विमान 186 प्रवाशांना घेऊन येत असताना या विमानात बॉम्ब असल्याची धमकी देण्यात आली आणि त्यानंतर विमान मुंबईला येण्याऐवजी अहमदाबाद ला वळवले. Sardar Vallabhbhai Patel International Airport वर सुमारे 10.13 च्या वेळी ते आले.

विमानतळावर सारे प्रवासी सुखरूप उतरवण्यात आले. त्यानंतर विमान आणि प्रवाशांच्या समानाची अहमादाबाद विमानतळावर डॉग स्कॉड कडून तपासणी करण्यात आली.

Akasa Air flight QP 1719 ही दिल्ली मुंबई प्रवास करताना आज विमानात 186 प्रवासी होते. त्यात एका तान्हा बाळाचा सहा क्रू मेंबर्सचा समावेश होता. Akasa Air spokesperson कडून सिक्युरिटी अलर्ट मिळाल्याची माहिती देण्यात आली. नक्की वाचा: Indigo Bomb Threat: इंडिगोच्या चेन्नई-मुंबई विमानात बॉम्बची धमकी, विमानाचे इमर्जन्सी मुंबई विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग; सर्व 172 प्रवासी सुरक्षित .

विमानसेवेच्या नियमावलीनुसार, दिल्ली मुंबई विमान अलर्ट मिळाल्यानंतर नजिकच्या अहमदाबाद विमानतळावर उतरवण्यात आलं. कॅप्टन कडून सार्‍या प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्या. सव्वा दहाच्या सुमारास विमान Sardar Vallabhbhai Patel International Airport उतरले. त्यानंतर ग्राऊंड वर विमान कंपनी कडून सारे सुरक्षेचे प्रोटोकॉल पाळण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now