Aurangabad Shocker: चिमुकलीच्या अंगावर उकळतं गरम पाणी पडलं, उपचारा दरम्यान मृत्यू, औरंगाबाद मधील घटनेमुळे परिसरात शोककला
औरंगाबाद येथे दोन वर्षांच्या चिमुकलीच्या अंगावर उकळत गरम पाणी पडल्यामुळे तीचा मृत्यू झाला आहे.
Aurangabad Shocker: अवघ्या दोन वर्षांच्या मुलीचा गरम पाणी अंगावर पडल्याने दुदैवी मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. ही घटना औरंगाबाद जिल्ह्यातील पडेगाव भागातील आहे.मंगळवारी 11 जुलै रोजी उपचारा दरम्यान तीचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. गॅसवरिल उकळत गरम पाणी अंगावर पडून भाडलेल्यामुळे तीला त्वरित रुग्णालयात दाखल करण्यात आले. शिद्रा हारून शेख असे मृत्य झालेल्या बालकांचे नाव आहे. या घटनेमुळे परिसर हादरले आहे.
वडिलांच्या आंघोळीसाठी आईने गरम पाणी ठेवल्यानंतर ही घटना घडली आहे. शिद्रा आपल्या दोन बहिणींसोबत खेळत होती दरम्यान खेळता खेळता शिद्रा च्या अंगावर गरम पाणी पडलं, गरम पाणी पडल्यामुळे गंभीर भाजलेल्या चिमुकलीने आरडाओरड केली. आवाज ऐकताच शिद्राच्या आईने धाव घेतला. तीला शेजराच्या मदतीने तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. तीच्यावर रुग्णालयात उपचार चालू करण्यात आले. ही घटना 7 जुलै रोजी घडली. 7 जुलै पासून तीच्यावर उपचार चालू होते.
अखेर 11 जुलै रोजी उपचारा दरम्यान साडे आठ वाजता तीनं श्वास सोडला. चिमुकलीच्या जाण्याने परिसरात शोककला पसरली आहे. याघटेनेची नोंद छावणी पोलीसांत करण्यात आली आहे. शिद्राचे कुटुंब पडेगावात कासंबरी दर्गा परिसरात राहते. शिद्राच्या मृत्यूमुळे कुंटूबांवर दुखाचा डोंगर पडला आहे.