Thane: ठाण्यातील मुंबई-नाशिक उड्डाणपुलाखालील रेतीबंदर खाडीजवळ आढळला 62 वर्षीय व्यक्तीचा मृतदेह
त्यांनी मृतदेह ताब्यात घेतला आणि पोस्टमार्टमसाठी पाठवला. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
Thane: ठाण्यातील कळवा (Kalwa) परिसरात शनिवारी मुंबई-नाशिक उड्डाणपुलाखालील (Mumbai-Nashik Flyover) रेतीबंदर खाडी (Retibandar Creek) येथे एका अनोळखी 62 वर्षीय व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. ठाण्यातील कळवा परिसरातील खारेगाव टोल नाक्याजवळ मुंबई-नाशिक उड्डाणपुलाखाली रेतीबंदर खाडीत मृतदेह सापडला असल्याची माहिती ठाणे महापालिकेच्या अधिकाऱ्याने दिली.
या घटनेची माहिती मिळताच नारपोली पोलिस अधिकारी (Narpoli Police Officers) घटनास्थळी पोहोचले. त्यांनी मृतदेह ताब्यात घेतला आणि पोस्टमार्टमसाठी पाठवला. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. (हेही वाचा - Kalyan Double Murder: कल्याणमध्ये दुहेरी हत्याकांड, पत्नी नंतर मुलाचा गळा दाबून केला खून, आरोपी फरार)
दरम्यान, शहरातील मासुंदा तलावात 12 सप्टेंबर रोजी सकाळी 9.30 च्या सुमारास 65 ते 70 वयोगटातील महिलेचा मृतदेह आढळून आला होता. ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी आणि अग्निशमन दलाने मृतदेह बाहेर काढून नौपाडा पोलिसांच्या ताब्यात दिला होता. (हेही वाचा - Indian Student Found Dead In London River: बेपत्ता भारतीय विद्यार्थ्याचा मृतदेह लंडन येथील नदीतआढळला)
नौपाडा पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटविण्याचा प्रयत्न केला. मात्र, अनेक दिवस उलटूनही कोणीही मयताचा दावा करण्यासाठी कोणीही हजर झाले नाही.