Body Massager and Sex Toy: बॉडी मसाजर उपकरणे सेक्स टॉय? हायकोर्टाने दिला महत्त्वाचा निर्णय
तसेच त्यांना विदेशातून आयात केल्या जाणाऱ्या प्रतिबंधीत वस्तू अथवा उत्पादनांच्या यादीमध्येही समाविष्ठ केले जाऊ शकत नाही (Body Massager Not Sex Toy), असे मुंबई उच्च न्यायालयाने म्हटले आहे.
शरीर मालिश (Body Massager) करण्यासाठी वापरली जाणारी उद्पादने प्रौढांसाठीची 'सेक्स टॉईज' (Sex Toys) म्हणून वर्गीकृत केली जाऊ शकत नाही. तसेच त्यांना विदेशातून आयात केल्या जाणाऱ्या प्रतिबंधीत वस्तू अथवा उत्पादनांच्या यादीमध्येही समाविष्ठ केले जाऊ शकत नाही (Body Massager Not Sex Toy), असे मुंबई उच्च न्यायालयाने म्हटले आहे. न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी आणि किशोर संत यांच्या खंडपीठाने सीमाशुल्क विभागाने बॉडी मसाज करणारी पॅकेजेस जप्त करण्याचे दिलेले आदेश रद्द करण्याचे निर्देश बुधवारी दिले. त्यामुळे जर कोणी बॉडी मसाज उपकरणे सेक्स टॉय म्हणून वापरत असेल तर त्यांच्यासाठीसुद्धा कोर्टाचा निर्णय महत्त्वाचा ठरू शकतो.
भारतामध्ये सेक्स टॉईज खरेदी-विक्रीस बंदी आहे. बॉडी मसाजर (Body Massager) उत्पादनांचा वापर प्रौढ किंवा अल्पवयीन लोक सेक्स टॉईज म्हणून करु शकतात. अशा प्रकारच्या उत्पादनांवर (सेक्स टॉईज) बंदी आहे, असे कस्टम विभागाने विदेशातून आलेले बॉडी मसाजरची उत्पादने जप्त केली होती. हायकोर्टाच्या न्यायाधीशांनी स्पष्ट भाषेत सांगीतले की, बॉडी मसाजर उत्पादनांचा वापर सेक्स टॉईज म्हणून केला जाऊ शकतो, हा विचार केवळ सीमाशूल्क आयुक्तांच्या मनातील कल्पनाविस्तार आहे. हायकोर्टाच्या खंडपीठाने सीमाशुल्क विभागाचे निर्देश बुधवारी खोडून काढले आणि जप्तीचे आदेश देणाऱ्या सीमा शुल्क आयुक्तांचे मत तथ्यात्मक पुराव्यांऐवजी निराधार गृहितकांवर आधारित होते, असे सांगितले. (हेही वाचा, Montana Sex Shop महिलांना देणार फुकटात सेक्स टॉय, कारण जाणून व्हाल हैराण)
केंद्रीय उत्पादन शुल्क आणि सेवा कर अपीलीय न्यायाधिकरणाने मे 2023 मध्ये बॉडी मसाज करणाऱ्या वस्तू जप्त करण्याचा सीमाशुल्क विभागाचा आदेश बाजूला ठेवून आदेश जारी केला. कस्टम आयुक्तांनी या आदेशाला आव्हान देणारी याचिका दाखल केली, ती न्यायालयाने फेटाळून लावली. निर्णायक अधिकारी या नात्याने, सीमा शुल्क आयुक्तांनी एप्रिल 2022 मध्ये बॉडी मसाजर्सची असलेली खेप मंजूर करण्यास नकार दिला. हे मसाजर्स म्हणजे प्रौढांची लैंगीक खेळणी (सेक्स टॉईज) असल्याचे आयुक्तांचे मत होते. अशा प्रकारची खेळणी, वस्तू आयात करण्यास जानेवारी 1964 च्या सीमाशुल्क अधिसूचनेनुसार परवानगी नसल्याचेही आयुक्तांनी म्हटले होते. (हेही वाचा, Masturbation Hygiene Tips: हस्तमैथुन केल्यानंतर सेक्स टॉय कशी कराल स्वच्छ? जाणून घ्या 'या' खास टिप्स)
सीमाशुल्क आयुक्तांच्या मतावर आणि युक्तीवादावर भाष्य करताना उच्च न्यायालयाने असे म्हटले आहे की, आयुक्तांचे निष्कर्ष "विचित्र आणि आश्चर्यकारक तसेच खूप दूरगामी असल्याचे दिसून येते. या उत्पादनांचा वापर लोक कसा करतील यांबाबत ते केवळ कल्पनेत आधारलेल्या विचारांवरच लिहीतात. जे त्यांच्या समजूतीवर आधारले आहे. ज्याला वास्तवाचा आधार नाही. न्यायाच्या निर्देशानुसार बॉडी मसाजर म्हणून वापरल्या जाणाऱ्या वस्तू प्रतिबंदीत वस्तूंमध्ये मोडत नाहीत आणि त्याचा देशांतर्गत व्यापारही केला जातो. न्यायालयाच्या या निर्णयामुळे एका महत्त्वाच्या मुद्द्यावर समाजाचे लक्ष वेधले आहे.