पुन्हा सुरु होणार BMC ची ‘खड्डे दाखवा 500 रु. मिळवा’ योजना; जाणून घ्या नियम व अटी
या योजनेला लोकांचा उदंड प्रतिसाद मिळाला, यामुळेच आता पुन्हा एकदा पालिका ‘खड्डे दाखवा 500 रु. मिळावा’ ही योजना सुरु करीत आहे. ही माहिती पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांची दिली.
मुंबई आणि खड्डे (Pothole) यांचे नाते अनेक वर्षांमध्ये अधिक घट्ट झाले आहे. या खड्ड्यांमुळे कित्येक अपघात घडले, अनेकांचा जीव गेला. याबाबत जनतेच्या वाढत्या रोषामुळे महापालिकेकडून (BMC) गेल्या आठवड्यात मुंबईला खड्डेमुक्त करण्यासाठी 'पॉटहोल चॅलेंज' (Pothole Challenge) सुरु केले. या योजनेला लोकांचा उदंड प्रतिसाद मिळाला, यामुळेच आता पुन्हा एकदा पालिका ‘खड्डे दाखवा 500 रु. मिळावा’ ही योजना सुरु करीत आहे. ही माहिती पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांची दिली. पालिकेने शुक्रवार, 1 नोव्हेंबरपासून ‘खड्डे दाखवा, 500 रुपये मिळवा’ अशी नामी योजना सुरु केली होती.
किमान एक फुट लांब आणि तीन इंच खोल खड्ड्यांचा फोटो दाखवा आणि 500 रुपये मिळावा अशी ही योजना होती. खड्ड्यांचे फोटो दाखवल्यावर 24 तासांत ते खड्डे बुजवले गेले नाहीत तर, तो फोटो देणाऱ्याला 500 रुपये मिळणार आहेत. याआधी शिवाजी पार्क मध्ये राहणारा रहिवाशी प्रथमेश चव्हाण यांने तब्बल 11 खड्डे दाखवत 5,500 रुपये कमावले. मात्र दुर्दैव हे आहे की, खड्ड्यांचे फोटो दाखवूनही पालिकेने खड्डे बुजवले नाहीत. ही बक्षिसाची रक्कम कंत्राटदाराच्या आणि वार्ड अधिकाऱ्यांच्या खिशातून देण्यात येणार आहे. (हेही वाचा: मुंबई महापालिकेच्या Pothole Challenge नुसार 24 तासात काम पूर्ण न केल्याने विजेत्याची पैसे परत देण्याची इच्छा)
या योजनेत सहभागी होण्यास अटी -
> खड्डा आहे पालिकेच्या हद्दीतील असावा
> खड्डा किमान 1 फुट लांब आणि तीन इंच खोल असावा
> या योजनेसाठी ‘mybmcpotholefixitl’ या अॅपवर तक्रार नोंदवावी लागेल.
> तक्रार नोंदवून 24 तासांत खड्डा बुजवला नाही तरच ही बक्षिसाची रक्कम मिळणार आहे.
दरम्यान, मुंबई शहरातील रस्ते आणि त्यावरील खड्डे यांवरुन मुंबई महापालिकेकडे अनेक तक्रारी येत असतात. तक्रारी आल्या की, रस्त्यांवरील खड्ड्यांमध्ये तात्पूरती खडी, रेती अथवा पेव्हरब्लॉक टाकले जातात. काही दिवसांनंतर पुन्हा रस्त्यांवरचे खड्डे तसेच दिसतात. त्यामुळे महापालिका टीकेचा विषय ठरते. यावर महापालिकेने नामी शक्कल लढवत ‘खड्डे दाखवा, 500 रुपये मिळवा’ अशी योजनाच जाहीर केली आहे.