तृतीयपंथीयांसाठी मुंबईत बांधण्यात येणार स्वतंत्र स्वच्छतागृहे; ही योजना लवकरच अंमलात आणण्याचा पालिकेचा विचार

तर तृतीयपंथीयांसाठी स्वतंत्र शौचालयेच नव्हती.

transgender (Photo Credits: Files Photo)

सध्या देशात 'राइट टू पी' चे वारे वाहत आहेत. याच धर्तीवर महापालिकेने महिलांसाठी स्वतंत्र शौचालये बांधण्यास सुरुवात झाली असून दिव्यांगांसाठीही व्यवस्था करण्यात आली आहे. असे असताना मग तृतीयपंथीयांसाठी (Transgender) स्वतंत्र शौचालय असावे अशी मागणी गेल्या अनेक दिवसांपासून होत होती. त्यामुळे आता तृतीयपंथीयांसाठीही शौचालये बांधण्याचा विचार महापालिका प्रशासन करत असल्याचे स्पष्ट केले आहे. मटा ने दिलेल्या वृत्तानुसार, मुंबईत मोक्याच्या आणि वर्दळीच्या ठिकाणी पुरुषांच्या तुलनेत महिलांची शौचालये फार कमी होती. तर तृतीयपंथीयांसाठी स्वतंत्र शौचालयेच नव्हती.

म्हणूनच 'राइट टू पी' चळवळीच्या आधारावर महिलांनी पालिका आणि सरकारपुढे मांडून शौचालयांच्या संख्येत वाढ करुन घेतली आहे. तर दुसरीकडे तृतीयपंथीयांसाठी स्वतंत्र शौचालये नसल्याने त्यांचीही फार अडचण होत होती. अशा वेळी कोणतीही अडचण येऊ नये म्हणून तृतीयपंथीयांसाठीही स्वतंत्र शौचालय बांधण्यात यावी अशी मागणी गेल्या कित्येक दिवसांपासून होत होती. मुंबईमध्ये उभे राहिले तब्बल 90 लाखाचे महागडे शौचालय

या मागणीची दखल घेत पालिकेने या सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. पालिकेच्या वतीने विविध स्वयंसेवी संस्थांच्या समन्वयाने गर्दीच्या ठिकाणी महिला आणि पुरुषांसाठी सार्वजनिक शौचालयांची उभारणी केली जाते. या सर्व शौचालयांचे व्यवस्थापन संबंधित संस्थांच्या माध्यमातून करण्यात येते. या शौचालयांमध्ये आत्तापर्यंत पुरुष आणि महिलांसाठी शौचकुपांची तसेच, मुतारींची व्यवस्था करण्यात आली आहे.

येत्या काळात तृतीयपंथीयांनाही ही सुविधा देण्यासंबंधी विचार करण्यात येईल, असे घनकचरा व्यवस्थापनाच्या प्रमुख अभियंत्यांनी लेखी अभिप्रायात स्पष्ट केले आहे.

***********************