Artificial Ponds for Ganesh Immersion in Mumbai: गणपती विसर्जनासाठी BMC 200 हून अधिक कृत्रिम तलाव उभारणार; Google Maps वर पाहता येणार तलावांची यादी

विशेष म्हणजे हे कृत्रिम तलाव गुगल मॅपवर सूचीबद्ध केले जाणार आहे. यामुळे नागरिक गुगल मॅपवर आपल्या परिसरातील कृत्रिम तलाव शोधू शकतात.

Ganesh Immersion (फोटो सौजन्य - X/@ZC_Kukatpally1)

Artificial Ponds For Ganesh Immersion in Mumbai: गणेश चतुर्थी (Ganesh Chaturthi 2024) च्या उत्सवाला काही दिवसांचा कालावधी बाकी आहे. अशातचं आता मुंबई महानगरपालिका (BMC) रस्त्यांची दुरुस्ती आणि नागरिकांना विसर्जनाच्या ठिकाणी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी तयारी करत आहे. यंदा गणेशोत्सवादरम्यान मुंबईतील गणेश मूर्तींचे विसर्जन (Ganpati Immersion) करण्यासाठी कृत्रिम तलाव (Artificial Ponds) उभारण्यात येणार आहे. विशेष म्हणजे हे कृत्रिम तलाव गुगल मॅप (Google Maps) वर सूचीबद्ध केले जाणार आहे. यामुळे नागरिक गुगल मॅपवर आपल्या परिसरातील कृत्रिम तलाव शोधू शकतात. ज्यामुळे सार्वजनिक ठिकाणी होणारी गर्दी टाळता येणार आहे. यासंदर्भात बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) माहिती दिली आहे.

बीएमसीने दिलेल्या माहितीनुसार, यावर्षी गणेशोत्सवात गणेशमूर्ती विसर्जनासाठी कृत्रिम तलावांची संख्या वाढविण्यात येणार असून संपूर्ण मुंबईत 204 कृत्रिम तलाव तयार करण्यात येणार आहेत. गेल्या काही वर्षांपासून कृत्रिम तलावात विसर्जनसाठी गणेश भक्तांकडून प्रतिसाद वाढत आहे. तथापी, गेल्या अकरा वर्षांत कृत्रिम तलावातील गणेश विसर्जनाच्या प्रमाणात तब्बल 371 टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे यंदा 200 हून अधिक कृत्रिम तलाव उभारले जातील आणि लोकांना तसेच गणेश मंडळांना त्यांचा वापर करण्यास आणि पर्यावरणपूरक उत्सवात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित केले जाईल, असे नागरी संस्थेने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. (हेही वाचा -Anant Ambani in Lalbaugcha Raja Sarvajanik Ganeshotsav Mandal: अनंत अंबानी लालबागचा राजा मंडळाचे मानद सदस्य)

दरम्यान, दहा दिवसांचा गणेशोत्सव यंदा 7 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती आणि रंगांमध्ये वापरल्या जाणाऱ्या रसायनांमुळे नद्या, तलाव आणि समुद्र या नैसर्गिक जलस्रोतांचे प्रदूषण टाळण्यासाठी महाराष्ट्रातील नागरी संस्थांकडून कृत्रिम तलावांमध्ये गणेश आणि गौरी मूर्तींचे विसर्जन करण्यास प्रोत्साहन दिले जाते. गेल्या वर्षी संपूर्ण शहरातील कृत्रिम तलावांसह पाणवठ्यांमध्ये एकूण 2,05,722 मूर्तींचे विसर्जन करण्यात आले होते. (हेही वाचा - ST Bus For Ganesh Chaturthi: गणेश चतुर्थीमुळे कोकणात जाणाऱ्या बसेस फुल्ल, प्रवाशांसाठी अधिक बसेस सोडण्यात येणार)

BMC च्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, कृत्रिम तलावांच्या ठिकाणाची माहिती देणारे QR कोड देखील दिले जातील. QR कोड या तलावांची माहिती भाविकांना देईल. क्यूआर कोड गणेश मूर्तीच्या पंडालच्या बाहेर ठळकपणे प्रदर्शित केले जातील. पर्यावरणपूरक मूर्तींना प्रोत्साहन देण्यासाठी नागरी संस्थेने मूर्तिकारांना मोफत चिकणमाती (शाडू माती) देण्याचा निर्णय घेतला आहे. उत्सव निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी उपायुक्त (झोन 2) प्रशांत सपकाळ यांच्या अध्यक्षतेखाली एक समन्वय समिती स्थापन करण्यात आली आहे. प्रक्रिया सुलभ करण्यासाठी, बीएमसीने गणेश मंडळांना परवानगी देण्यासाठी ऑनलाइन एक-खिडकी प्रणाली सुरू केली आहे.