Yashwant Jadhav: यशवंत जाधव यांच्या 40 मालमत्ता आयकर विभागाने जप्त केल्याचे वृत्त
मुंबई महापालिका (BMC) स्थायी समिती अध्यक्ष आणि शिवसेना (Shiv Sena) नेते यशवंत जाधव (Yashwant Jadhav) यांच्यावर आयकर विभागाने (Income Tax) मोठी कारवाई केल्याचे समजते. यशवंत जाधव यांच्या जवळपास 40 मालमत्ता आयकर विभागाने मर्यादित काळासाठी जप्त केल्याची माहिती आहे
मुंबई महापालिका (BMC) स्थायी समिती अध्यक्ष आणि शिवसेना (Shiv Sena) नेते यशवंत जाधव (Yashwant Jadhav) यांच्यावर आयकर विभागाने (Income Tax) मोठी कारवाई केल्याचे समजते. यशवंत जाधव यांच्या जवळपास 40 मालमत्ता आयकर विभागाने मर्यादित काळासाठी जप्त केल्याची माहिती आहे. तसेच, वांद्रे येथील जाधव यांचा सुमारे पाच कोटी रुपये किमतीचा एक फ्लॅटही आयकरने जप्त केल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांनी सूत्रांच्या हवाल्याने दिली आहे. भायखळा येथील सुमारे 26 फ्लॅट्स जप्त करण्यात आले असून हे फ्लॅटही जाधव यांचेच असल्याचे सांगितले जात आहे. या प्रकरणात जाधव यांच्या नातेवाईकांच्या नावावर असलेली मालमत्ताही जप्त केल्याची चर्चा आहे.
सांगितले जात आहे की, यशवंत जाधव हे आपल्या नातेवाईकांच्या माध्यमातूनही संपत्ती संचय करत असत. त्यामुळे त्यांच्या काही नातेवाईकांनाही ईडीने नोटीस पाठवल्याचे समजते.विनित जाधव हे यशवंत जाधव यांचे यांचे पुतणे आणि मोहिते नावाचे आणखी एक नातेवाईक यांनाही आयकरने समन्स पाठवले आहे. (हेही वाचा, Aaditya Thackeray On Yashwant Jadhav Diary: यशवंत जाधव, मातोश्री, घड्याळ भेट यांवर आदित्य ठाकरे यांची प्रतिक्रिया)
यशवंत जाधव यांच्याकडे सापडलेल्या एका डायरीत काही नावे कोडवर्डमध्ये आढळून आली आहेत. यापैकी काही नावे 'मातोश्री', ‘केबलमॅन’ आणि ‘एम ताई’ अशा प्रकारची आहेत. या काही नावांसोबत कोट्यवधी तर काहींसोबत लाखो रुपयांचे व्यवहार झाल्याचे वृत्त आहे. त्यामुळे जाधव कुटुंबीय चर्चेत आले असतानाच महापालिका निवडणुकीच्या तोंडावर अशी कारवाई होणे हा शिवसेनेसाठी धक्का मानला जातो आहे.
ट्विट
पाठिमागील काही दिवसांपासून केद्रीय तपास यंत्रणा महाराष्ट्रात सक्रीय झाल्या आहेत. या यंत्रणा प्रामुख्याने शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवर कारवाई करत असल्याने एक वेगळे चित्र निर्माण झाले आहे. केंद्रीय तपास यंत्रणांनी वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये आता पर्यंत शिवसेनेचे प्रताप सरनाईक, संजय राऊत, यशवंत जाधव यांच्यावर कारवाई केली आहे. तर राष्ट्रवादीचे अजित पवार, अनिल देशमुख, नवाब मलिक यांच्यावरही कारवाई केली आहे. एकाच वेळी विशिष्ट राजकीय पक्षांच्या विशिष्ट नेत्यांवरच कारवाई केल्याने तपास यंत्रणाही मोठ्या प्रमाणावर चर्चेत आहेत.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)