COVID-19 Vaccination In Mumbai: मुंबई मध्ये BMC, शासकीय केंद्रांवर आज केवळ 3 तास सुरू राहणार लसीकरण; इथे पहा संपूर्ण यादी
ही लस मर्यादित केंद्रांवर उपलब्ध असेल.
मुंबई मध्ये मागील 2 दिवस लसीकरण मोहिमेला लागलेला ब्रेक आता उठण्याची चिन्हं आहेत. आज मुंबई महानगर पालिकेने दिलेल्या माहितीनुसार, मर्यादित स्वरूपात आणि ठराविक वेळेमध्ये पुन्हा बीएमसी आणि राज्य सरकारच्या लसीकरण केंद्रांवर आज नागरिकांना कोरोना प्रतिबंधात्मक लस मिळण्यास सुरूवात होणार आहे. 18 वर्षांवरील सार्या ना गरिकांचा या मध्ये समावेश करण्यात आला आहे. पण त्याला वेळेचं बंधन असणार आहे. दुपारी 2 ते 5 या तीन तासांच्या वेळेमध्येच हे लसीकरण राबवले जाईल. तसेच कोवॅक्सिनचा दुसरा डोस आज केवळ दिला जाणार आहे. कोविशिल्ड देखील 45 वर्षांवरील नागरिकांना देण्यासाठी प्राधान्य असेल. त्यानुसार केंद्रांची वर्गावारी करण्यात आली आहे.
दरम्यान आज केवळ 3 तास खुल्या असणार्या लसीकरण मोहिमेमध्ये नागरिकांना 50% रजिस्ट्रेशन आणि 50% ऑन द स्पॉट व्हॅक्सिन अशा दोन्ही पर्यायांमध्ये सोय दिली जाणार आहे. (नक्की वाचा: Mumbai Vaccination Scam: मुंबईतील कोविड 19 लसीकरण घोटाळ्यातील मुख्य आरोपी Manish Tripathi ला 4 जुलै पर्यंत पोलिस कोठडी).
मुंबईतील कोवॅक्सिन लस मिळणारी केंद्रं
केवळ 45 वर्षांवरील नागरिकांना येथे कोवॅक्सिनचा दुसरा डोस मिळेल.
मुंबईत कोविशिल्ड लस मिळणारी केंद्रं
मुंबईत खालील केंद्रांवर 45 वर्षांवरील नागरिकांना कोविशिल्ड मिळेल.
18 वर्षांवरील नागरिकांना लस मिळणारी केंद्रं
दरम्यान लसीचा दुसरा डोस घेणार्यांना पहिल्या डोसचे प्रमाणपत्र सोबत ठेवणं गरजेचे आहे अशी माहिती देखील देण्यात आली आहे. भारतामध्ये आता 21 जून पासून 18 वर्षांवरील सार्यांनाच केंद्र सरकार कडून लस दिली जात आहे. ही लस शासकीय केंद्रांवर मोफत उपलब्ध आहे.