BMC Ward War Rooms Contact Numbers: मुंबई मध्ये कोरोनाग्रस्तांसाठी हॉस्पिटलमध्ये बेड्सची उपलब्धता आणि अत्यावश्यक माहिती देण्यासाठी वॉर्डनुसार मुंबई महानगरपालिकेने जारी केले खास हेल्पलाईन नंबर्स
महाराष्ट्रातील मुंबई शहराभोवती कोरोना व्हायरसचा विळखा दिवसेंदिवस तीव्र होत आहे. त्यामुळे शहरातील वाढती रुग्णसंख्या पाहता मुंबई महानगरपालिकेडून कोविड-19 वार्ड रुम सुरु करण्यात आल्या आहेत
कोरोना बाधितांच्या संख्येत महाराष्ट्र (Maharashtra) राज्य देशात प्रथमस्थानी आहे. महाराष्ट्रातील मुंबई (Mumbai) शहराभोवती कोरोना व्हायरसचा विळखा दिवसेंदिवस तीव्र होत आहे. त्यामुळे शहरातील वाढती रुग्णसंख्या पाहता मुंबई महानगरपालिकेडून कोविड-19 वार्ड वॉर रुम (Ward War Room) सुरु करण्यात आल्या आहेत. त्यामुळे कोरोनाग्रस्त रुग्णांना बेड न मिळणे किंवा इतर तक्रारी दूर करण्यास मदत होणार आहे. तसंच या वार्ड रुमशी संपर्क करुन बेड उपलब्धता आणि इतर माहिती त्वरीत प्राप्त होऊ शकते. यासाठी मुंबई महानगरपालिकेने काही नंबर्स जारी केले आहेत. त्यामुळे कोरोनाग्रस्त रुग्णांची गैरसोय कमी होऊन त्यांच्या कुटुंबियांची चिंता कमी होण्यास नक्कीच मदत होईल.
BMC ने ट्विट करत हेल्पलाईन नंबर्सची माहिती दिली आहे. कोविड-19 च्या माहितीकरता किंवा बेडची आवश्यकता असल्यास आपल्या विभागाच्या नियंत्रण कक्षाच्या नंबरवर संपर्क साधा. BMC ने कक्षानुसार नंबर्सची यादी जारी केली आहे. (COVID-19 In Mumbai Update: कोरोनामुळे मुंबईत एकूण 1 हजार 855 जणांचा मृत्यू; दिवसभरात आढळले 1 हजार 567 नवे रुग्ण)
BMC Tweet:
महाराष्ट्रातील कोरोना बाधितांचा आकडा 94041 वर पोहचला आहे. तर 3438 रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. त्यापैकी 52667 कोरोनाग्रस्त रुग्ण एकट्या मुंबईत आहे. त्यापैकी 23694 रुग्ण उपचारानंतर पूर्णपणे बरे झाले त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. दरम्यान मुंबईत 1857 रुग्णांचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाला आहे.