Coronavirus: मुंबई महापालिकेने 55 वर्षांवरील कर्मचा-यांसाठी बनविली खास नियमावली, करावे लागणार 'या' नियमांचे पालन
त्याचबरोबर सरकारी वैद्यकीय विभागातील 55 वर्षांवरील डॉक्टर्स, परिचारिका ज्यांना मधुमेह, उच्च रक्तदाब यांसारखे आजार असतील त्यांनी पुढील 2 आठवड्यांसाठी घरी राहण्याचा सल्ला दिला आहे.
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस (Coronavirus) रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून मुंबईत सर्वाधिक कोरोना रुग्ण आढळले आहेत. अशा परिस्थितीत येत्या 3 मे ला लॉकडाऊनचा शेवटचा दिवस आहे. हा लॉकडाऊन देखील वाढविणार की नाही याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. मात्र हळूहळू ऑफिसेस सुरु होण्याच्या मार्गावर आहेत. यामुळे सद्य स्थिती पाहता मुंबई महापालिकेने (BMC) 55 वर्षांवरील कर्मचा-यांसाठी खास नियमावली बनविली आहे. ज्यानुसार, 55 वर्षांवरील सरकारी कर्मचा-यांना केवळ Work From Home वा ऑफिसेस मध्ये काम करण्याचे सांगितले आहे.
त्याचबरोबर सरकारी वैद्यकीय विभागातील 55 वर्षांवरील डॉक्टर्स, परिचारिका ज्यांना मधुमेह, उच्च रक्तदाब यांसारखे आजार असतील त्यांनी पुढील 2 आठवड्यांसाठी घरी राहण्याचा सल्ला दिला आहे.
हेदेखील वाचा- उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती कोरोनामुक्त झाल्या मागचे 'हे' कारण सांगत येथील नागरिकांचे केले कौतुक
BMC ने कर्मचा-यांची 100%उपस्थिती मागितली असून 55 वर्षांवरील कर्मचा-यांसाठी ही विशेष मुभा देण्यात आली आहे.
हे नियम त्यांच्या सुरक्षिततेसाठी बनविण्यात आले आहे. त्याचबरोबर सद्य स्थितीत मुंबईबाहेरील BMC कर्मचा-यांना जसे ठाणे, नवी मुंबई, मिरा-भाईंदर वा पालघर इ. सद्य स्थितीत त्यांच्या घराजवळील BMC वॉर्ड मध्ये काम करण्याची मुभा दिली आहे. याचाच अर्थ कर्मचा-यांना त्यांच्या सद्य स्थितीतील ऑफिसेसमध्ये जाण्याची गरज नाही. ही मुभा कालावधीसाठी देण्यात आली आहे.