मुंबईत आणखी सव्वालाख Covishield लसींचा साठा दाखल; दुसऱ्या टप्प्यासाठी 1 लाख 70 हजार नोंदणी

दरम्यान, सीरम इन्स्टिट्यूटच्या सव्वालाख कोविशिल्ड लसींचा साठा मुंबई महानगरपालिकेला उपलब्ध झाला आहे. यापूर्वी 15 जानेवारीला पुण्याहून 1 लाख 39 हजार 500 लसींचा साठा मुंबईत दाखल झाला होता.

COVID-19 vaccine | Representational Image (Photo Credits: IANS)

मुंबईसह देशभरात कोरोना लसीकरणाला (Corona Vaccination) सुरुवात झाली आहे. दरम्यान, सीरम इन्स्टिट्यूटच्या (Serum Institute) सव्वालाख कोविशिल्ड लसींचा साठा मुंबई महानगरपालिकेला (BMC) उपलब्ध झाला आहे. यापूर्वी 15 जानेवारीला पुण्याहून 1 लाख 39 हजार 500 लसींचा साठा मुंबईत दाखल झाला होता. त्यानंतर गुरुवारी रात्री 1 लाख 25 हजार लसींचा साठा मुंबईत आणण्यात आला. त्यामुळे आतापर्यंत मुंबईला एकूण 2 लाख 64 हजार 500 लसी उपलब्ध झाल्या आहेत. कोविशिल्ड लसीचे नव्याने उपलब्ध झालेले डोसेस परळच्या एफ दक्षिण विभागात साठवण्यात आले आहेत.

मुंबईत पहिल्या टप्प्यातील लसीकरण सुरु असून कोविड अॅप वर नोंदणी करण्यात आलेल्या 1 लाख 25 हजार कर्मचाऱ्यांना लसीचा पहिला डोस देण्यात येत आहे. त्यानंतर दुसरा डोस 28 दिवसांनी देण्यात येणार आहे. दरम्यान, 16 जानेवारी पासून आतापर्यंत एकूण 13 हजार 365 आरोग्य सेवकांना लसीचे डोस देण्यात आले आहेत. दररोज 4 हजार लसींचे डोस देण्याची पालिकेची तयारी असली तरी सुरुवातीला लस घेण्यासाठी येणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांची संख्या 50 टक्के इतकीच होती. मात्र हळूहळू कर्मचाऱ्यांकडूनही चांगला प्रतिसाद मिळू लागला आहे.

लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात आरोग्यसेवकांना लस देण्यात येत असून दुसऱ्या टप्प्यातील लसीकरणासाठी पोलिस आणि महापालिका कर्मचारी यांची नोंदणी सुरु झाली आहे. आतापर्यंत एकूण 1 लाख 70 हजार कर्मचाऱ्यांची नोंदणी करण्यात आलेली आहे. (BMC ने आरोग्यसेवकांना दिली Walk-in Vaccination ची मुभा; जाणून घ्या, काय आहे हा पर्याय?)

दरम्यान, यापूर्वी आरोग्य कर्मचाऱ्यांकडून लसीकरणाला मिळणारा कमी प्रतिसाद पाहता मुंबई पालिकेने Walk-in Vaccination ची मुभा दिली होती. यामुळे लसीकरणाला वेग येईल, अशी आशा होती. Walk-in Vaccination म्हणजे बीएमसीने ठरवून दिलेल्या स्लॉट व्यतिरिक्त जरी आरोग्यसेवक केंद्रावर गेले तर त्यांना लस देण्यात येईल.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif