यावर्षी Christmas आणि New Year साजरा करता येणार नाही? लवकरच मुंबई महापालिका जाहीर करणार नवी नियमावली

कोरोनाच्या (Coronavirus) पार्श्वभूमीवर देशात अनेक धार्मिक, सास्कृतिक आणि समाजिक कार्यक्रम रद्द किंवा लॉकडाऊनच्या निर्बंधांखाली साजरी करण्यात आली आहेत.

New Year's Party (Photo credits: Needpix)

कोरोनाच्या (Coronavirus) पार्श्वभूमीवर देशात अनेक धार्मिक, सास्कृतिक आणि समाजिक कार्यक्रम रद्द किंवा लॉकडाऊनच्या निर्बंधांखाली साजरी करण्यात आली आहेत. यामुळे यावर्षी पहिल्यांदाच ख्रिसमस (Christmas) आणि नुतन वर्ष (New Year) सेलिब्रेशनला ब्रेक लागण्याची शक्यता आहे. ख्रिसमस आणि नुतन वर्षाच्या निमित्ताने मुंबईकरांनी गर्दी करु नये, यासाठी येत्या 20 डिसेंबर रोजी मुंबई महानगरपालिका (BMC) नवी नियमावली जाहीर करणार आहे. मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी हा बाबतची माहिती दिली आहे.

ख्रिसमस आणि नवीन वर्ष साजरा करण्यासाठी घराबाहेर पडतात. दरम्यान, मुंबईतील अनेक चौपाटीवर बरेच लोक एकत्र जमतात. परंतु, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे गरजे आहे. यामुळे चौपाट्यांवर गर्दी होऊ नये, यासाठी मुंबई महापालिकेकडून खबरदारी घेतली जात आहे. याशिवाय, हॉटेलमधील स्टाफसाठीही नियमावली जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. महत्वाचे म्हणजे, कोरोनाचे संकट टळले नसतानाही मास्क न लावता नाईट क्लबमध्ये गर्दी करत आहेत. यासाठी मुंबई महापालिकेकडून विशेष काळजी घेतली जात आहे, असेही काकाणी यांनी म्हंटले आहे. यासंदर्भात टीव्ही९ने वृत्त दिले आहे. हे देखील वाचा- BMC: विना मास्क नाईट क्लबमध्ये करत होते हुल्लडबाजी; मुंबई महानगरपालिकेने ठोठावला 30 हजारांचा दंड

मुंबईत आज 521 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर, 7 सात जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 2 लाख 85 हजार 580 वर पोहचली आहे. यापैकी 10 हजार 995 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, 2 लाख 64 हजार 851 जणांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या मुंबईत 8 हजार 812 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif