BMC Budget 2021: शिक्षण समितीचंं बजेट सादर; मुंबई महापालिकेच्या शाळा मुंबई पब्लिक स्कूल म्हणून ओळखल्या जाणार
यावेळी शिक्षण विभागाचे 2945 कोटींचं बजेट जाहीर करण्यात आले आहे.
आशियातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका अशी ओळख असलेल्या मुंबई महानगर पालिकेचं (BMC) आज बजेट सादर होणार आहे. दरम्यान मुंबई महानगर पालिकेमध्ये आज दुपारी शिक्षण विभागाचं बजेट सादर झालं आहे. शिक्षण समिती अध्यक्षा संध्या दोशी सक्रे यांच्या उपस्थिती मध्ये सहआयुक्त रमेश पवार (Ramesh Pawar) याांनी मांडले. यावेळी शिक्षण विभागाचे 2945 कोटींचं बजेट जाहीर करण्यात आले आहे. दरम्यान आज (3 फेब्रुवारी) करण्यात आलेल्या महत्त्वाच्या घोषणांमध्ये आता मुंबई महानगरपालिका शाळांचं नाव 'मुंबई पब्लिक स्कूल' असं होणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे.BMC Budget 2021: सहआयुक्त रमेश पवार पाणी समजून सॅनिटायझर प्यायले; मुंबई महापालिका अर्थसंकल्प सादर करतानाची घटना.
शिक्षण समितीच्या बजेट मधील लक्षवेधी गोष्टी
# आज बजेट मध्ये कोविड 19 चा प्रभाव पाहता शाळांमध्ये त्याच्या दृष्टीने काही सोयी-सुविधांची पुर्तता केली जाणार आहे. दरम्यान त्यासाठी अंदाजे 15 कोटी रूपये असतील. यामध्ये विद्यार्थ्यांना शाळांमध्ये सॅनिटाझर, साबण दिले जाणार आहेत.
# आता मुंबई मध्ये मुंबई महापालिका10 नवीन CBSE Board शाळा सुरू करणार आहेत त्यासाठी 2 कोटींची तरतूद आहेत. या शाळा मुंबई शहरात 2 , पश्चिम उपनगरात 3 पूर्व उपनगरात 5 अशा असतील.
# उच्च माध्यमिक शाळांमधल्या विद्यार्थ्यांसाठी करिअर काऊन्सलिंगचे कार्यक्रम राबवले जाणार आहेत.
#माध्यमिक शाळांमधून मार्च 2020 पासून परीक्षेत उत्तीर्ण होऊन प्रथम येणाऱ्या 25 विद्यार्थ्यांना प्रतिवर्षी प्रति विद्यार्थी रु 25,000/- इतकी रक्कम अथवा पूर्ण शैक्षणिक शुल्काचा लाभ देण्यात येणार आहे.
#व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरच्या शिक्षकांद्वारे व्हिडीओ तयार करुन 40 युट्यूब चॅनलवर मराठी, हिंदी, उर्दू, व इंग्रजी माध्यमांत अपलोड करण्यात आले. व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटर अर्थसंकल्पीय तरतूद प्राथमिक- रु. ८.०५ कोटी माध्यमिक- रु. ५.१० कोटी.
# विद्यार्थ्यांना वैयक्तिक मार्गदर्शनासाठी मे 2021 पासून `करिअर टेन लॅब´या संस्थेमार्फत मार्गदर्शन केले जाणार आहे. ज्यामध्ये महाविद्यालयीन प्रवेश प्रक्रीया पार पाडण्याकरता मार्गदर्शन करण्यात येईल. त्यासाठी 21.10 लाखांची तरतूद करण्यात आली आहे.
# महापालिकेच्या 1300 वर्गांमध्ये डिजिटल रूम सुरू होणार आहेत त्यासाठी 28.58 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
(नक्की वाचा: BMC Budget 2021-22: मुंबई महानगर पालिकेचं आत्तापर्यंत सर्वाधिक 39038 कोटींचं बजेट जाहीर; पहा काय आहेत तरतुदी).
BMC Tweet
दरम्यान आज दुपारच्या सत्रामध्ये मुंबई महानगर पालिकेचे शहरासाठीचं बजेट सादर केले जाणार आहे. हे बीएमसी आयुक्त इक्बाल सिंह चहल यांचं पहिलेच बजेट असणार आहे. या बजेट मध्ये शहरातील सोयी सुविधा, कर आणि अन्य गोष्टींबद्दल काय घोषणा होणार याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.