BMC Budget 2021: मुंबई महापालिका अर्थसंकल्प आज सादर होणार; सर्वासामान्यांना काय मिळणार याबाबत उत्सुकता
कोरोना व्हायरस संकटामुळे आगोदरच आर्थिक आरिष्ठात असलेला मुंबईकर, मुंबईतील व्यवसायिक आणि तोंडावर आलेली महापालिका निवडणूक अशा दुहेरी पार्श्वभूमीवर सत्ताधारी शिवसेनेला आपला अर्थसंकल्प सादर करावा लागतो आहे.
आशिया खंडातील सर्वात मोठी आणि श्रीमंत महापालिका अशी ओळख असलेल्या बृहन्मुंबई महापालिकाेचा अर्थसंकल्प (BMC Budget 2021) आज (3 फेब्रुवारी) सादर होत आहे. महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल (Municipal Commissioner Iqbal Singh Chahal ) हा अर्थसंकल्प सादर करतील. मुंबई महापालिका (BMC ) आपल्या आपल्या अर्थसंकल्पा मुंबईकरांना काय भेट देते आणि कोणाकोणावर बोझा टाकते याकडे शहरवासीयांचे लक्ष लागून राहिले आहे. कोरोना व्हायरस संकटाच्या पार्श्वभूमीवर हा अर्थसंकल्प सादर होत आहे. त्यामुळे उत्सुकता, कुतूहल आणि आपेक्षा अशा संमिश्र भावना आहेत.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केंद्रीय अर्थसंकल्प संसदेत नुकताच जाहीर केला. या अर्थसंकल्पावर बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खोचक टीका करत 'अर्थसंकल्प हा देशासाठी हवा, निवडणुकांसाठी नाही' असे म्हटले होते. त्यामुळे गेली अनेक वर्षे शिवसेनेच्या ताब्यात असलेल्या मुंबई महापालिका अर्थसंकल्पात सर्वसामान्य मुंबईकरांसोबतच इतर घटकांना काय मिळते याबाबत उत्सुकता आहे. (हेही वाचा, Mumbai Local च्या वेळेत सामान्य नागरिकांसाठी बदल होणार? पहा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची प्रतिक्रिया)
कोरोना व्हायरस संकटामुळे आगोदरच आर्थिक आरिष्ठात असलेला मुंबईकर, मुंबईतील व्यवसायिक आणि तोंडावर आलेली महापालिका निवडणूक अशा दुहेरी पार्श्वभूमीवर सत्ताधारी शिवसेनेला आपला अर्थसंकल्प सादर करावा लागतो आहे. त्यात लॉकडाऊन काळात सर्वच काही ठप्प राहिल्याने महापालिकेच्या उत्पन्नात आपेक्षीत वाढ झाली नाही. त्याउलट महसूली तूटच झाल्याचे पाहायला मिळाले. आतापर्यंतचा विचार करता नेहमीच्या तुलनेत केवळ 25 ते 30% इतकाच महसूल महापालिकेला प्राप्त झाला आहे. त्यामुळे अर्थसंकल्प हा काट्यावरची कसरत ठरणार आहे. (हेही वाचा, BMC Budget: मुंबई महापालिका उद्या सादर करणार बजेट, नागरिकांच्या आरोग्य अर्थसंकल्पाकडून अपेक्षा)
उत्पन्न कमी आणि खर्च अधिक अशी स्थिती असलेल्या मुंबई महापालिकेसमोर नागरिकांचे समाधान करायचे तरी कसे? हा सवाल निर्माण झाला आहे. महापालिकेने या आधी 500 चौरस फुटापर्यंतच्या घरांचा सर्वसाधारण कर माफ केला आहे. आता या घरांचा मालमत्ता कर संपूर्णपणे माफ करावा अशी मागणी मोठ्या प्रमाणावर होऊ लागली आहे. गेल्या वर्षी बीणेमची अर्थसंकल्प 33,441 कोटी रुपयांचा होता. यंदा त्यात 8 ते 10% टक्के वाढ होणे अपेक्षीत आहे.