BKC पोलिसांनी बंद केली रिक्षा चालकाची US Consulate बाहेरील सशुल्क लॉकर सुविधा

हर्ष गोएंंका यांनीही ही गोष्ट शेअर केली होती. विना अ‍ॅप, एमबीए डिग्री हा अस्सल इंडियन जुगाड असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली होती.

BKC पोलिसांनी बंद केली रिक्षा चालकाची  US Consulate बाहेरील सशुल्क लॉकर सुविधा
Mumbai Police | (Photo Credits: Marathi Latestly)

काही दिवसापूर्वी मुंबईत अमेरिकन काऊंसलेट (US Consulate) बाहेर एक रिक्षा चालक केवळ लगेज सेवा देऊ लाखो रूपये कमवत असल्याची बाब समोर आली. सोशल मीडीयामध्ये Rahul Rupani ची पोस्ट तुफान वायरल झाल्यानंतर ही बाब समोर आली. पोलिसांनी या प्रकरणामध्ये लक्ष घालून बीकेसी पोलिसांनी त्या रिक्षा चालकाला समन्स बजावत चौकशीला बोलावलं. असे दिसून आले की त्याच्यासारखेच आणखी 12 जण होते ज्यांनी व्हिसा साठी येणार्‍यांचे सामान एका दुकानातील लॉकरमध्ये ठेवण्याची ऑफर दिली होती. ते सर्व जवळच्या भारत नगर झोपडपट्टीत राहत होते.

FPJ च्या बातमीनुसार. पोलिसांनी दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये या चालकांकडे लॉकर्स भाड्याने घेण्याचा परवाना नव्हता. चोरी झाली किंवा अन्य मोठा अनर्थ झाल्यास काय? याची जबाबदारी पोलिसांवर येते. पोलिसांनी कोणताही गुन्हा नोंदवला नाही, परंतु व्हिसा साठी येणार्‍यांना अत्यंत आवश्यक सेवा देऊन चालकांना फक्त बाह्य उत्पन्न मिळत होते यावर त्यांनी सहमती दर्शवली. एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने FPJ ला सांगितले की, "ऑटो चालकाकडे प्रवाशांची वाहतूक करण्याचा परवाना आहे, लॉकर सेवा चालवण्याचा नाही. म्हणून, आम्ही या प्रकरणाची चौकशी केली आणि त्याने आता लॉकर्स देणे बंद केले आहे." नक्की वाचा: मुंबईत US Consulate च्या एका नियमाने रिक्षा चालकाला मिळाली साईड बिझनेस ची संधी; महिन्याला कमावतो लाखो रूपये.  

हजारो व्हिसा अर्जदार बीकेसी येथील अमेरिकन काऊन्सलेटला येतात, त्यापैकी अनेकांना हे माहित नसते की आवारात बॅगा घेऊन जाण्यास सक्त मनाई आहे. जवळपास अधिकृत लॉकर किंवा स्टोरेज सुविधा नसल्यामुळे, अर्जदारांना अनेकदा त्यांचे सामान कुठे ठेवावे याबद्दल चिंता असते. नेमकी हीच गैरसोय हेरून अनेक रिक्षा चालक लॉकर सेवा देत होते.

 

(The above story first appeared on LatestLY on Jun 11, 2025 03:38 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).