महाराष्ट्र: वाढत्या वीजबिलाविरोधात राज्यात भाजपचे 'टाळे ठोको' आंदोलन

सरकारच्या वीज कनेक्शन तोडीविरोधात आज भाजप संपूर्ण राज्यात टाळे ठोको आंदोलन करत आहे.

BJP | (File Image)

राज्यात आज अनेक ठिकाणी वाढत्या वीजबिलाविरोधात (Electricity Bill) भाजपकडून (BJP) आंदोलन करण्यात येत आहे. यात अनेक जिल्ह्यात भाजपने 'टाळे ठोको' (Tala Thoko Andolan) आंदोलनाला सुरुवात केली आहे. वीज बिलाच्या मुद्द्यावरून आज ठाकरे सरकारला धारेवर धरणार आहेत. दिवसेंदिवस राज्यात वीज बिलाचे वाढते आकडे पाहता सरकारच्या अनागोंदी कारभारावर एक नजर टाकण्यासाठी भाजपने हे आंदोलन केले आहे. सरकारच्या वीज कनेक्शन तोडीविरोधात आज भाजप संपूर्ण राज्यात टाळे ठोको आंदोलन करत आहे.

महाविकास आघाडी सरकारचा 72 लाख कनेक्शन तोडण्याचा निर्णय हा मोगलाई आहे. आधी 100 युनिट माफ करणार असं सांगितलं. लोकप्रिय घोषणा केली खरी पण पुढे काय झाल, फक्त वाहवा मिळवून वीज बिलात माफी देण्याची वेळ आली तेव्हा उर्जामंत्र्यांचा प्रस्ताव उपमुख्यमंत्र्यांनी फेटाळला असे भाजपकडून सांगण्यात येत आहे.हेदेखील वाचा- Petrol Rate in Maharashtra: महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहेत पेट्रोलचे सर्वाधिक दर, जाणून घ्या सविस्तर

ज्या शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं त्यांना आधीच काही मिळाल नाही तर मग ही लोक पैसे कसं भरणार. 72 लाखांची वीज कनेक्शन तोडणार असेल तर याचा फटका कोट्यवधी लोकांना बसणार आहे, असं भाजपचं म्हणणं आहे. म्हणून भाजप आज राज्यभर या निर्णयाविरोधात आंदोलन करत आहेत.

TV9 मराठी ने दिलेल्या माहितीनुसार, कांदिवलीत भाजपचं वीज बिल दरवाढीविरोधात आंदोलन सुरु झाले असून भाजप कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी केली जात आहे. मात्र, पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखलं. तर दुसरीकडे वीज बिलाप्रकरणी भाजपने केलेल्या टाळे ठोको आंदोलनात कोल्हापुरात भाजप कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये झटापट झाली. आम्ही महावितरणच्या कार्यालयाला टाळं ठोकलं, तेव्हा पोलिसांनी बळाचा चुकीचा वापर केला, काही पोलिसांनी शिवीगाळही केली याचा आम्ही निषेध करतो असे भाजप आंदोलनकर्ते म्हणाले. हा आंदोलन दाबण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif