Petrol Rate in Maharashtra: महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहेत पेट्रोलचे सर्वाधिक दर, जाणून घ्या सविस्तर

पुणे (Pune), नाशिक (Nashik), परभणी (Parbhani) जिल्ह्यातही पेट्रोलचे दर वाढले आहेत. मुंबईत डिझेलचा आजचा दर प्रति लीटर 83.99 रुपये इतका आहे.

Petrol Rate in Maharashtra: महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहेत पेट्रोलचे सर्वाधिक दर, जाणून घ्या सविस्तर
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: PTI)

मागील काही दिवसात पेट्रोल-डिझेलच्या (Petrol-Diesel Rate Today) किंमतीत लक्षणीय वाढ झाली आहे. महाराष्ट्रात पेट्रोलचे दर तर 90 रुपयांच्या पार गेले आहेत. यामुळे रोज रस्ते वाहतूकीने प्रवास करणा-या लोकांवर महागाईची टांगती तलवार आली आहे. goodreturns या संकेतस्थळानुसार आज (5 फेब्रुवारी) पेट्रोलचा मुंबईतील (Mumbai) दर प्रति लीटर 93.49 रुपये इतका आहे. त्याचबरोबर पुणे (Pune), नाशिक (Nashik), परभणी (Parbhani) जिल्ह्यातही पेट्रोलचे दर वाढले आहेत. मुंबईत डिझेलचा आजचा दर प्रति लीटर 83.99 रुपये इतका आहे.

यासोबत महाराष्ट्रातील अन्य जिल्ह्यातही पेट्रोल-डिझेलचे दर वाढले आहेत. महाराष्ट्रात आज सर्वाधिक पेट्रोलचा दर हा परभणी जिल्ह्यात आहे. येथे पेट्रोलचा दर प्रति लीटर 95. 67 रुपये इतका आहे. goodreturns या संकेतस्थळानुसार जाणून घेऊया पेट्रोल-डिझेलचे आजचे दर

हेदेखील वाचा- Petrol Diesel Price Today: पेट्रोल-डिझेलच्या किंमती गगनाला भिडल्याने सामान्यांच्या खिशाला चाप, पाहा आजचे नवे दर

शहर पेट्रोल (प्रति लीटर रुपये) डिझेल (प्रति लीटर रुपये)
मुंबई 93.49 83.99
पुणे 93.21 82.44
ठाणे 93.6 84.1
नागपूर 93.38 82.65
नाशिक 93.76 82.98
परभणी 95.67 84.82
रत्नागिरी 94.76 83.97
सिंधुदुर्ग 94.66 83.87

दरम्यान नियमित सकाळी 6 वाजता पेट्रोल डिझेलची मूळ रक्कम ऑईल कंपन्यांकडून जाहीर केल्या जातात. त्यावर शहरानुसार टॅक्स प्रमाणे आणि अन्य करांनुसार किंमती वर खाली होत असतात. वेगवेगळ्या कंपन्यांनुसार हे इंधनाचे दर बदलतात. त्यामुळे योग्य दर जाणून घ्यायचा आल्यास तुम्हांला ऑनलाईन अ‍ॅप किंवा वेबसाईटच्या माध्यमातून दर पाहता येऊ शकतात.

कसे पहाल अचूक दर?

तुमच्या शहरानुसार अचूक दर पहायचे असतील तर इंडियन ऑयल ग्राहक RSP-डीलर कोड-92249 9 2249 वर,बीपीसीएल RSP-डीलर कोड- 9223112222 वर, एचपीसीएल ग्राहक HPPRICE-डीलर कोड- 9222201122 वर इथे मेसेज करू शकतो. तसेच ऑईल कंपन्यांच्या वेबसाईटवर म्हणजेच www.iocl.com, www.bharatpetroleum.com, www.hindustanpetroleum.com वर देखील दर पाहण्याची सोय आहे.

(The above story first appeared on LatestLY on Feb 05, 2021 12:07 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).