महाराष्ट्र ग्रामपंचायतीच्या निवडणूकीत भाजपाच एक नंबरचा पक्ष- देवेंद्र फडणवीस

भाजपचा विजय पक्का असल्याचा विश्वास देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला आहे.

Devendra Fadnavis (Photo Credits: Twitter)

सर्व महाराष्ट्र उत्सुकता लागून राहिलेला ग्रामपंचायत निवडणूकीचा निकाल (Gram Panchayat Election Result 2021) हाती आला आहे. आज उशिरापर्यंत सर्व निकाल स्पष्ट होणार असले तरीही आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार, 'भाजपाच नंबर एकचा पक्ष असेल' असा दावा भाजपते विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केला आहे. लोकांच्या मनात सरकारबद्दल रोष आहे असून तिघे एकत्र येऊनदेखील भाजपा एक नंबरला येतो यावरुन हेच दिसतं असं ते एबीपी माझाशी बोलताना म्हणाले आहेत. भाजपचा विजय पक्का असल्याचा विश्वास देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला आहे.

"ज्याप्रकारे भाजपाला लोकांनी सर्मथन दिलं आहे त्याचा मला अतिशय आनंद आहे. आम्ही समर्थन दिलेले सगळे पॅनल ग्रामपंचयातीमध्ये चांगला विजय मिळवत आहेत. विशेष म्हणजे विदर्भ, मराठवाडा. उत्तर महाराष्ट्र, कोकण किंवा पश्चिम महाराष्ट्र असेल… सगळ्या भागात भाजपा एक नंबरचा पक्ष झाला आहे. इतर पक्षांच्या तुलनेत आम्ही खूप पुढे गेलो आहेत. अनेक ग्रामपंचायतींमध्ये आम्ही सर्व जागा जिंकल्या आहोत. लोकांनी प्रचंड प्रतिसाद दिला आहे," असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.हेदेखील वाचा- Maharashtra Gram Panchayat Election Result 2021: भाजपचे 6000 सरपंच होतील, चंद्रकांत पाटील यांचा दावा

"विदर्भात अभुतपूर्व यश आहेच, पण कोकणातदेखील चांगलं यश मिळालं आहे. खासकरुन सिंधुदूर्गात इतक्या चांगल्या प्रकारे म्हणजेच जवळपास ८० टक्के ग्रामपंचायती जिंकलो आहोत. राणे कुटुंब, रवींद्र चव्हाण तसंच तेथील कार्यकर्ते सर्वांनीच खूप मेहनत केली. सत्तेत असतानाही रत्नागिरीत यश मिळालं नव्हतं. पण आता मोठं यश मिळालं आहे" असं देखील फडणवीस यावेळी म्हणाले.

चंद्रकांत पाटील यांच्या खानापूर गावात झालेल्या पराभवावर बोलताना ते म्हणाले की, "असं होत असतं, आती मी जयंत पाटील सासूरवाडीत जिंकू शकले नाही अशी बातमी पाहिली, तिथे राष्ट्रवादी हारली. एखाद्या गावात कमी अधिक होत असतं. त्याचवेळी पश्चिम महाराष्ट्रात चंद्रकांतदादांना टार्गेट करण्याचा प्रयत्न झाला" असं ते म्हणाले.