Video: देवेंद्र फडणवीस यांचे नाव घेता खुर्चीच तुटली, जागेवरच कोलमडले चंद्रकांत पाटील; उठून म्हणाले 'सरकार पडणार'

चंद्रकांत पाटील यांना भाजपतील अनेक कार्यकर्त्यांसह राज्यातील अनेक लोक त्यांना दादा म्हणतात. आपल्या रोखठोक आणि दिलखूलास वक्तव्यासाठी दादा प्रसिद्ध. त्यामुळे ते कधी काय बोलतील आणि बातमीला विषय मिळेल याकडे प्रसारमाध्यमांचे बारिक लक्ष असते.

Chandrakant Patil | (Photo Credits: YouTube Video Screenshots)

Chandrakant Patil Viral Video: चंद्रकांत पाटील. भाजप (BJP) प्रदेशाध्यक्ष. भर पत्रकार परिषदेत जागेवरच कोलमडले. विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याबाबत ते बोलत होते आणि खुर्चीचा पायच मोडला. त्यामुळे असे घडले. तसे पाहता ही घटना म्हणजे केवळ अपघात. कोणताही अपघात वाईटच. पण, आता हे ट्रोलर्स आणि सोशल मीडियावर वावरणाऱ्या नेटीझन्सना कोण सांगणार? दादांच्या कोलमडण्याचा (Chandrakant Patil Fell Down) व्हिडिओ आता समाजमाध्यमांवर भलताच व्हायरल झाला आहे. तो नुसता व्हायरलच झाला नाही तर, 'सत्ता गेल्याने खुर्चीही साथ सोडते आहे' अशी खोचकी टिप्पणीही केली जाऊ लागली आहे. चंद्रकांत पाटील यांना भाजपतील अनेक कार्यकर्त्यांसह राज्यातील अनेक लोक त्यांना दादा म्हणतात. आपल्या रोखठोक आणि दिलखूलास वक्तव्यासाठी दादा प्रसिद्ध. त्यामुळे ते कधी काय बोलतील आणि बातमीला विषय मिळेल याकडे प्रसारमाध्यमांचे बारिक लक्ष असते.

काय घडले?

चंद्रकांत पाटील हे बुधवारी सोलापूर जिल्हा दौऱ्यावर होते. या दौऱ्यादरम्यान त्यांनी एक पत्रकार परिषद घेतली. पत्रकांरांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना पाटील दिलखुलासपणे उत्तरे देत होते. पत्रकारांनी विचाललेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना चंद्रकांत पाटील म्हणत होते, 'आगामी निवडणूक भाजप स्वबळावर लढवणार. पंकजा मुंडे, एकनाथ खडसे हे नाराज नाहीत. तसेच, देवंद्र फडणवीस हे दिल्लीला जाणार नाहीत. अनेकदा मला विविध बातम्या प्रसारमाध्यमांतूनच कळतात. देवेंद्र फडणवीस यांच्याबाबतही मला प्रसारमाध्यमांतूनच कळले.' दरम्यान, पुढे बोलताना 'देवेंद्र फडणीस हे राज्यातील प्रभावी नेते आहेत' असेही पाटील म्हणाले. मात्र, देवेंद्र फडणीस यांचे नाव घेताच चंद्रकांत पाटील खुर्चीवरुन खाली कोलमडले. आणि उठून म्हणाले फडवणवीस हे राज्यातील प्रभावी नेते आहेत. (हेही वाचा, चंद्रकांत पाटील यांची गच्छंती? महाराष्ट्र, दिल्ली विधानसभा पराभवानंतर भाजप कार्यकारिणी बैठकीत खांदेपालट होण्याची शक्यता)

शिवसेनेच्या अनिल देसाईंनी दोन अपत्यांच्या कायद्याचे विधेयक मांडले आहे. त्यावर देसाईंनी सेनेला विचारले का? सेनेने काँग्रेसला विचारले का? मुस्लिमांना विचारले का, असा टोलाही शिवसेनेला लगावला. दरम्यान, राज ठाकरे यांनी आपले धोरण बदलत हिंदुत्त्वाचा मुद्दा हाती घेतला तर, त्यांना सोबत घेऊ असे पाटील म्हणाले. मात्र, पाटलांच्या उत्तरावर शिवसेना सोबत आली तर मनसेचे काय करणार असा सवाल विचारला असता 'हा अवघड प्रश्न आहे' असे म्हणत पाटील यांनी या विषयावर बोलणे टाळले.

पाहा व्हिडिओ

खुर्चीवरुन काली कोलमडलेल्या पाटील यांनी उठून दुसऱ्या खुर्चीवर बसत हे महाविकासआघाडी सरकार लवकरच पडणार असेही म्हटले. तसेच, खर्ची जुनी होती. त्यामुळे तुटली असे सांगत पाटील यांनी बाजू सावरली. त्यानंतर शहाजी पवार यांची खुर्ची घेत आमदार सुभाष देशमुख यांनी पाटील यांना बदललेल्या खुर्चीवर बसवले. दरम्यान, पाटील यांचा खुर्चीवरुन कोलमडण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर भलताच व्हायरल झाला आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now