Pune BJP: पुणे भाजपमध्ये खांदेपालट, धीरज घाटे, शंकर जगताप यांच्यावर नवी जबाबदारी
आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन भाजपने संघटनात्मक बदल केले आहेत.
BJP State Level OrganizationalChanges: भारतीय जनता पक्षाने राज्य पातळीवर संघटनात्मक बदलांवर भर दिल्याचे पहायला मिळत आहे. पक्षाने नुकतेच आपल्या जिल्हाध्यक्षांच्या नियुक्त्या जाहीर केल्या. पक्षाचे प्रांताध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ट्विटरवरुन याबातब माहिती दिलीआहे. दरम्यान, भाजपने पुणे जिल्ह्यामध्ये महत्त्वाचे फेरबदल कले असून पुणे शहराध्यक्ष पदी धीरज घाटे (Dhiraj ghate) तर पिंपरी-चिंचवडच्या शहराध्यक्षपदी लक्ष्मण जगताप यांचे बंधू शंकर जगताप (Shankar Jagtap) यांना संधी देण्यात आली आहे. आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन भाजपने संघटनात्मक बदल केले आहेत.
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलेल्या माहितीद्वारे पक्षाने राज्यभरात संघटनात्मक बदल करत 70 पदांवर नव्याने नियुकत्या केल्या आहेत. या सर्व नियुक्त्या पाहता भाजप आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकांच्या तयारीला लागला असल्याचे स्पष्ट जाणवते आहे. पुणे शहर भाजपची जबाबदारी जगदीश मुळीक यांच्यावर होती. तर पिंपरी चिंचवड भाजपचे शहराध्यक्ष महेश लांगडे यांच्याकडे होती. दोघांचाही कार्यकाळ संपल्याने पक्षाने त्या पदावर नव्याने नियुक्त केली आहे. पुणे ग्रामीणमध्ये बारामती शहराध्यपदी वासुदेव काळे तर मावळ शहराध्यपदी शरद बुट्टे पाटील यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली आहे. (हेही वाचा, Sudhir Mungantiwar Prediction: अनिल परब यांचा अश्वत्थामा होईल, सचिन अहिर भाजपसोबत असतील; सुधीर मुनगंटीवर यांची भविष्यवाणी)
पुणे शहर भाजपची जबाबदारी सोपविलेले धीरज घाटे हे सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात प्रदीर्घ काळापासून सक्रीय असलेले नेते आहेत. पाठिमागील 32 वर्षांपासून ते राजकारणात आहेत. या आधी त्यांनी नगरसेवक आणि महापालिकेचे सभागृह नेते म्हणूनही जबाबदारी सांभाळली आहे. पुणे शहराच्या राजकीय वातावरणाची त्यांना जाण आहे. महापालिका निवडणुकीत त्यांच्या नावाची नेहमी चर्चा असते. साने गुरुजी मंडळ व हिंदू गर्जना प्रतिष्ठान या संस्थांच्या माध्यमांतूनही ते समाजकारणात सक्रीय असतात.
शंकर जगताप हे सुरुवातीला राष्ट्रवादीत होते. मात्र, त्यांचे बंधू दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्यासोबत तेही भाजपमध्ये आले. भाजपमध्ये ते चांगले स्थिरावले. दरम्यान, त्यांचे बंधू लक्ष्मण जगताप यांचे निधन झाले. ज्याचा फटका भाजपला पिंपरी चिंचवड शहरात बसला. त्यामुळे अध्यक्षपद देऊन शंकर जगताप यांना ताकद देण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. भविष्यातील विधानसभा निवडणुकीत प्रमुख चेहरा म्हणून शंकर जगतपा यांच्याकडे पाहिले जात आहे.