IPL Auction 2025 Live

सत्तासंघर्ष 2019: मुख्यमंत्रीपद वगळता शिवसेनेला 16 मंत्रीपदं देण्यास भाजप तयार: सूत्र

या दैऱ्यात मुख्यमंत्री फडणवीस यांनी भाजप राष्ट्रीय अध्यक्ष, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. तर, शरद पवार हे काँग्रेस पक्ष हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेणार आहेत.

Shiv Sena-BJP Alliance | Image only representative purpose (Photo credit: pixabay)

शिवसेना-भाजप (Shiv Sena-BJP) यांच्यात मुख्यमंत्री (Chief Minister) पदावरुन सुरु असलेला सत्तासंघर्ष थांबण्याचे चिन्ह नाही. दोन्ही बाजूंनी आपापल्या मतांवर ताठरता दाखवण्यात येत आहे. त्यामुळे सरकार स्थापनेस विलंब लागत आहे. दरम्यान, शिवसेनेसाठी भाजपने सत्तावाटपसाठी नवा प्रस्ताव ठवल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले आहे. या वृत्तात भाजप (BJP) मुख्यमंत्रीपदावरचा हक्क सोडण्यास तयार नाही. मात्र, मुख्यमंत्री पद (Chief Minister) वगळता भाजप शिवसेनेला महसूल खात्यासह इतर 16 मंत्रिपदं देण्यास तयार असल्याचे म्हटले आहे.

सरकार स्थापनेचा तिढा सुटत नसताना राज्यात मात्र अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. त्यामुळे विरोधी पक्षांनी सरकारवर टीकेची झोड उठवली असून, राजकीय स्वार्थापुढे राज्याच्या हिताकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने भाजप-शिवसेनेवर केला आहे. दुसऱ्या बाजूला विरोधी पक्षांनी पावसामुळे झालेले शेतकऱ्यांचे नुकसान पाहण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादीचे नेते शेतीच्या बांधावर पोहोचले आहेत. त्यामुळे काळजीवाहू सरकारमधील मंत्रीही शेतीच्या बांधावर जाऊ लागले आहेत. मात्र, काळजीवाहू सरकारला विविध प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी मर्याता येत असल्याचे स्पष्ट होत आहे. (हेही वाचा, महाराष्ट्रात सत्ता स्थापनेतील वादावर रोहित पवार यांचा सवाल; जर बाळासाहेब ठाकरे असते तर भाजपची एवढी हिंमत झाली असती का?)

दरम्यान, सत्तास्थापनेचा तिढा सोडविण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अध्यक्ष शरद पवार हे दिल्ली दौऱ्यावर आहेत. या दैऱ्यात मुख्यमंत्री फडणवीस यांनी भाजप राष्ट्रीय अध्यक्ष, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. तर, शरद पवार हे काँग्रेस पक्ष हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेणार आहेत. दोन्ही नेत्यांच्या या बेठीमधील तपशील विस्ताराने अद्याप बाहेर आला नाही. मात्र, नजीकच्या काळात या भेटीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलतापालथ झाल्याचे पाहायला मिळू शकते.