Shiv Sena on BJP: '.. तर बाबरी पाडल्यावर शिवसेनेचा पंतप्रधान झाला असता, भाजप केवळ सत्तेसाठी हिंदुत्त्व वापरते', संजय राऊत यांचा घणाघात

तेव्हा बाबरी आम्हीच पाडली हे जाहीरपणे शिवसेनेने सांगितले. त्यामुळे उत्तर भारतामध्येही हिंदुत्वाची (Hindutva) लाट होती. शिवसेनेला सर्वांची पसंती होती. त्यावेळी जर आम्ही उत्तर प्रदेशात निवडणूक लढलो असतो तर, शिवसेनेचा पंतप्रधानही होऊ शकला असता, असे प्रतिपादच शिवसेना ( Shiv Sena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केले आहे.

Sanjay Raut | (Photo Credits-ANI)

बाबरी (Babri Masjid) पाडल्यानंतर अनेक लोक पळाले होते. तेव्हा बाबरी आम्हीच पाडली हे जाहीरपणे शिवसेनेने सांगितले. त्यामुळे उत्तर भारतामध्येही हिंदुत्वाची (Hindutva) लाट होती. शिवसेनेला सर्वांची पसंती होती. त्यावेळी जर आम्ही उत्तर प्रदेशात निवडणूक लढलो असतो तर, शिवसेनेचा पंतप्रधानही होऊ शकला असता, असे प्रतिपादच शिवसेना ( Shiv Sena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केले आहे. दरम्यान, हिंदुत्वाची लाट आणि जनमत शिवसेनेच्या बाजूने असूनही आम्ही उत्तर भारतात निवडणूक लढवली नाही. युतीधर्म निभावला. महाराष्ट्रात भाजप जमीनीपासून आकाशापर्यंत शिवसेनेमुळेच पोहोचला, असेही संजय राऊत यांनी म्हटले आहे.

संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटले आहे की, शिवसेनेने महाराष्ट्रात भाजपला खालपासून वरपर्यंत नेले. बाबरीनंतर उत्तर भारतात शिवसेनेची लाट होती, त्यावेळी आम्ही निवडणूक लढवली असती तर देशात आमचे (शिवसेनेचे) पंतप्रधान झाले असते पण आम्ही ते त्यांच्यासाठी (भाजप) सोडले. भाजप केवळ सत्तेसाठी हिंदुत्वाचा वापर करते, असा घणाघातही संजय राऊत यांनी या वेळी बोलताना केला. (हेही वाचा, CM Uddhav Thackeray on BJP: 'शिवसेनेने भाजपसोबत युती करून 25 वर्षे वाया घालवली', सीएम उद्धव ठाकरे यांची भाजपवर कडाडून टीका)

भाजप सोबत जे पक्ष गेलेत त्यांच्याशी ते शिवसेनेप्रमाणेच वागले आहेत. भाजप सोबत जाण्याची किंमत प्रत्येक राजकीय पक्षाला भोगावी लागली आहे. मग ते पक्ष अकाली दल असो, गोव्यात एमजीपी असो किंवा हरियाणा असो, चंद्रबाबू नायडू असो, जयललिता यांचा पक्ष असो. पण, शिवसेना हा एकमेव पक्ष आहे. ज्याने भाजपला त्यांच्या वर्तनाची किंमत चुकवायला लावली आहे, अशा शब्दात राऊत यांनी भाजपला टोला लगावला आहे.

शिवसेना महाराष्ट्राबाहेर वाढली नाही. महाराष्ट्राबाहेर वाढण्याची संधी शिवसेनेने भाजपला दिली. असे असताना आता भाजपच शिवसेनेला डोळे दाखवत आहे, अशा अशयाचे विधान उद्धव ठाकरे यांन केल्याच्या पार्श्वभूमीवर विचारले असता राऊत म्हणाले, बाळासाहेबांनी देशभरामध्ये शिवसेना विस्ताराचं मनावर घेतलं असतं तर चित्र वेगळं दिसलं असतं.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif