Udayanraje Bhosale Met Sharad Pawar: भाजप खासदार उदयनराजे भोसले घेणार शरद पवार यांची भेट, राजकीय वर्तुळात अनेकांच्या भूवया उंचावल्या
त्यामुळे उदयनराजे भोसले यांना जर शरद पवार यांची सहज भेट घ्यायची असती तर ते राज्यसभा अथवा संसद आवारात बोलू शकत होते. मात्र ही भेट नियोजित असल्याने अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत.
भारतीय जनता पक्षाचे (BJP) खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale ) यांनी राजधानी दिल्ली येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेणार आहेत. भेटीचे कारण अद्याप समजू शकले नाही. परंतू, आज (गुरुवार, 11 फेब्रुवारी) सायंकाळी 5.30 वाजता ही भेट होणार असल्याचे सांगितले जात आहे. भाजपचे जावळी विधानसभा मतदारसंघातील भाजप आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी नुकतीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली होती. त्यानंतर आता काहीच दिवसात उदयनराजे भोसले यांनी शरद पवार यांची होत असल्याने राजकीय वर्तुळात अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत.
विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस खासदारपदाचा राजीनामा दिल्यानंतर उदयनराजे हे पहिल्यांदाच शरद पवार यांची भेट घेत आहेत. उदयनराजे भोसले हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तिकीटावर लोकसभा निवडणूक 2019 निवडूण आले. पण अवघ्या चारच महिन्यात सप्टेंबर 2019 मध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून मिळालेल्या खासदारकीचा राजीनामा दिला. त्यानंतर लागलेल्या पोटनिवडणुकीत उदयनराजे भोसले भाजपच्या तिकीटावर पुन्हा उभे राहिले. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार श्रीनिवास पाटील यांच्याकडून त्यांना पराभव स्वीकारावा लागला.
शरद पवार आणि उदयनराजे भोसले हे दोघेही राज्यसभा खासदार आहेत. त्यामुळे उदयनराजे भोसले यांना जर शरद पवार यांची सहज भेट घ्यायची असती तर ते राज्यसभा अथवा संसद आवारात बोलू शकत होते. मात्र ही भेट नियोजित असल्याने अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत.