शरद पवार शकुनीमामा, प्रियांका गांधी म्हणजे तैमूर- पुनम महाजन
भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चा (Bharatiya Janata Yuva Morcha) अध्यक्षा पुनम महाजन(Poonam Mahajan) यांनी राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना रामायणातील 'मंथरा' आणि महाभारतातील 'शकुनीमामा' असल्याचे म्हटले आहे. त्या
भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चा (Bharatiya Janata Yuva Morcha) अध्यक्षा पुनम महाजन(Poonam Mahajan) यांनी राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना रामायणातील 'मंथरा' आणि महाभारतातील 'शकुनीमामा' असल्याचे म्हटले आहे. त्याचसोबत मोदीजींच्या विरोधाकांची महाआघाडी म्हणजे महा'ठग'बंधन असल्याची टीका करण्यात आली आहे.
पूनम महाजन रविवारी (3 फेब्रुवारी) सोमय्या मैदानावर आयोजित केलेल्या सीएम चषक (CM Chashak) पारितोषक वितरण समारंभात उपस्थिती लावली होती. त्याचवेळी शरद पवार यांच्यावर टीकेची झोड उठवत ते रामायणातील मंथरा आणि महाभारतातील शकुनीमामा असल्याचे म्हटले आहे. तर विरोधी पक्षांनी जे महाभारत सुरु केले आहे त्यामध्ये हे नाकखुपसत असल्याचे ही पूनम महाजन यांनी म्हटले आहे. एवढच नसून मोदी यांचा विकासाचा मार्ग रोखून ठेवत अल्याने काही होणार नाही. उलट पक्षाला अजून मजबूती मिळत असल्याचे वक्तव्य महाजन यांनी केले.(हेही वाचा-नरेंद्र मोदी महिषासूर, प्रियंका गांधी दुर्गामाता: पोस्टरबाजीमुळे भाजप पक्षात संतापाचे वातावरण)
तर दुसऱ्या बाजूस राहुल गांधी जे फक्त आपल्या आईचे ऐकून राफेल-राफेल म्हणून ओरडत फिरत असतात. परंतु राहुल गांधी हे आता 'रा-फूल' बनले आहेत. त्याचसोबत प्रियांका गांधी यांना पक्षात स्थान देत 'बेटी लाओ, बेटी बचओ' असा युक्तीवाद केला आहे. तर प्रियांका गांधी यांचे फोटो सुद्धा काँग्रेस पक्षाकडून सर्वत्र झळकावण्यात आल्याने त्या तैमूर अली खान झाल्याचे हास्यास्पद वक्तव केले आहे.
विरोधी पक्षांवर निशाणा साधत पुनम महाजन यांनी असे ही म्हटले की, ममता बॅनर्जी म्हणजे 'दशहतवाद पसरवाणारा दादा' असून त्यांचे काम तर अमानवीय स्वरुपाचे आहे. हिच स्थिती एसपी चे अखिलेश यादव आणि बीएसपी पक्षाच्या मायावतींची आहे. त्यामुळे कधी कधी हे दोघे कुत्र्या-मांजरांसारखे भांडत असतात असे ही वादग्रस्त विधान त्यांनी यावेळी केले. तर आता मोदी यांच्या कार्यामध्ये कसा अडथळा येईल याचा मार्ग पाहून एकत्र काम करत आहेत. त्यामुळे विरोधी पक्षांची महाआघाडी ही आता महा'ठग'बंधन झाले आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)