IPL Auction 2025 Live

उद्धव ठाकरेंच्या राज्यात, डर से रहो अगर हिंदू हो! पालघर प्रकरणावरुन नितेश राणे यांचा घणाघाती हल्ला, पहा ट्विट

तर उद्धव ठाकरे यांच्या राज्यात ‘डर से रहो अगर हिंदू हो,’ असा फरक आहे, अशी टीका पालघर प्रकरणावरुन भाजपचे आमदार नितेश राणे यांनी केली आहे.

Nitesh Rane criticizes CM Uddhav Thackeray (PC- Facebook)

गुरुवार 16 एप्रिल रोजी पालघर (Palghar) येथील डहाणू गडचिंचले येथे दोन साधू आणि त्यांच्या वाहनचालकाला जमावाने दगड, लाठ्या मारून ठेचून ठार केले होते, हे प्रकरण सध्या सर्व स्तरावरून चर्चेचा विषय ठरले आहे. अनेकांनी यावर टीका करत महाराष्ट्र सरकारला (Maharashtra Governmemt) धारेवर धरले आहे. अशीच कठोर शब्दातील टीका भाजपाचे आमदार नितेश राणे (Nitesh Rane)  यांनी केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्यावर या प्रकरणावरून हल्लाबोल करताना शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या राज्यात ‘गर्व से कहो हम हिंदू है’ अशी परिस्थितीत होती. तर उद्धव ठाकरे यांच्या राज्यात ‘डर से रहो अगर हिंदू हो,’ असा फरक आहे, अशी टीका नितेश राणे यांनी केली आहे.

याशिवाय अन्य एक ट्विट करून नितेश राणे यांनी “पालघरमध्ये घडलेल्या घटनेनं राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राहिल्याचं दिसत नाही. काय घडतंय यावर कोणाचंही नियंत्रण नाही. लोकं आपला संयम गमावत आहेत आणि ही एक सुरूवात आहे. सरकार आपलं संपूर्ण नियंत्रण गमावत आहे,” असं सुद्धा म्हंटले आहे. Palghar Mob Lynching Case: पालघर मॉब लिंचींग प्रकरणामागे धार्मिक कारण नाही - उद्धव ठाकरे

नितेश राणे ट्विट

पालघर प्रकरणावरून संतापला सुमीत राघवन; महाराष्ट्राला संतांची वीरांची भूमी नवे तर नराधमांची भूमी म्हणत केले ट्विट

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काही वेळापूर्वी फेसबुक लाईव्ह च्या माध्यमातून याबाबत राज्यातील नागरिकांना माहिती दिली. पालघर मध्ये घडलेला हा प्रकार नक्कीच निंदनीय आहे. सरकार आपल्या परीने या प्रकारात तपास करत आहे. या प्रकरणात 5 प्रमुख आरोपींसह 110 जणांना अटक करण्यात आले आहे. 2 पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबीत करण्यात आले आहे, त्यांच्यावर कारवाई सुद्धा केली जाणार आहे. म्हणून पूर्णतः सरकारवर आरोप लावणे, हे योग्य नाही असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हंटले आहे.