MLA Mihir Kotecha Accuses State Government: ब्लॅक लिस्टमध्ये टाकलेल्या कंत्राटदारांना राज्य सरकारमधील मंत्र्याने क्लिन चिट दिली आहे, भाजप आमदार मिहिर कोटेचा यांचा सरकारवर आरोप
आम्ही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या महासंचालकांकडे तक्रार करणार आहोत. असे भाजप आमदार आणि खजिनदार मिहिर कोटेचा यांनी पत्रकारांना सांगितले.
भारतीय जनता पक्षाने (BJP) शुक्रवारी हलक्या दर्जाचा कामांसाठी 2017-18 मध्ये पालिकेने काळ्या सूचीत (Black List) टाकलेल्या कंत्राटदारांना (Contractors) क्लिन चिट (Clean chit) दिली आहे, असा आरोप केला आहे. राज्यातील महा विकास आघाडीचे राज्य (MVA) सरकारमध्ये मंत्री यांनी क्लीन चिट दिली आहेत, असे वक्तव्य आमदार मिहिर कोटेचा (MLA Mihir Kotecha) यांनी केला आहे. तसेच हे प्रकरण लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (ACB) नेण्याची धमकी दिली आहे. हेही वाचा Phone Tapping Case: फोन टॅपिंग प्रकरणात फडणवीसांनी नाही तर आव्हाड आणि मलिकांनी पुरावे लीक केले होते, रश्मी शुक्लांचे मुंबई उच्च न्यायालयात स्पष्टीकरण
2017-18 मध्ये बृहन्मुंबई महानगरपालिकेने काळ्या यादीत टाकलेल्या कंत्राटदारांना क्लीन चिट देण्यासाठी सत्ताधारी एमव्हीए सरकारमधील एक मंत्री आणि त्याच्या चुलत भावाकडून गंभीर प्रयत्न केले जात आहे. आम्ही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या महासंचालकांकडे तक्रार करणार आहोत. असे भाजप आमदार आणि खजिनदार मिहिर कोटेचा यांनी पत्रकारांना सांगितले.
कोटेचा यांच्या म्हणण्यानुसार, बीएमसीने मुंबईतील नऊ कंत्राटदारांना रस्त्यांच्या बांधकामात 975 कोटी रुपयांच्या गैरव्यवहारासाठी काळ्या यादीत टाकले होते आणि त्यांच्याविरुद्ध आवश्यक कायदेशीर कारवाई सुरू केली होती. दुर्दैवाने हे प्रकरण बंद होण्याआधी या कंत्राटदारांना क्लीन चिट देण्यासाठी MVA सरकारमधील एक मंत्री आणि त्याच्या चुलत भावाने सुपारी घेतली,असे ते पुढे म्हणाले.