Mukta Tilak Passes Away: भाजप आमदार तथा पुण्याच्या माजी महापौर मुक्ता टिळक यांचे निधन
त्या 57 वर्षांच्या होत्या. त्यांना कर्करोगाची लागण झाली होती. कर्करोगासारख्या दुर्धर आजाराशी लढा देता देता पुणे येथे आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कसबा विधानसभा मतदारसंघातून त्या भाजपच्या तिकीटावर विधिमंडळात प्रतिनिधीत्व करत होत्या.
विद्यमान आमदार आणि पुण्याच्या माजी महापौर मुक्ता टिळक यांचे प्रदीर्घ आजाराने निधन (Mukta Tilak Passes Away) झाले आहे. त्या 57 वर्षांच्या होत्या. त्यांना कर्करोगाची लागण झाली होती. कर्करोगासारख्या दुर्धर आजाराशी लढा देता देता पुणे येथे आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कसबा विधानसभा मतदारसंघातून त्या भाजपच्या तिकीटावर विधिमंडळात प्रतिनिधीत्व करत होत्या. त्यांच्यावर पुणे येथील गॅलेक्सी केअर रुग्णालयात उपचार सुरु होते. सुरुवातीपासूनच त्यांची नाळ भाजपशी जोडली गेली होती. केवळ पक्षावरील निष्ठा आणि प्रेमापोटी त्या व्हिलचलचेअरवर बसून पुणे ते मुंबई असा दीर्घ पल्ल्याचा प्रवास करत राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीस हजर राहिल्या होत्या.
मुक्ता टिळक या पहिल्यांदा 2019 मध्ये भाजपच्या तिकीटावर विधानसभेवर निवडून गेल्या. तत्पूर्वी त्या पुण्याच्या महापौरही होत्या. महापौर पादवर असताना त्यांच्या कार्यकाळात पुण्यात अनेक महत्त्वाच्या गोष्टी घडल्या. त्यामुळे पक्षाने त्यांच्यावर विश्वास दाखवत त्यांना विधानसभेवर संधी दिली. पक्षाने दिलेली संधी घेत त्यांनी कसबा मतदारसंघातून विजय मिळवला. कसबा मतदारसंघ हा गिरीश बापट यांचा बालेकिल्ला समजला जायचा. याच मतदारसंघातून त्यांनी विधिमंडळात प्रवेश केला. पण, आमदार म्हणून कारकीर्दी नावारुपाला येण्यापूर्वीच त्यांना कर्करोगाने ग्रासले. त्यातच त्यांचा अंत झाला.
ट्विट
मुक्ता टिळक यांनी भावे स्कूलमधून शिक्षण घेतले. त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण हे पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयात झाले. त्या मानसशास्त्र विषयातून एमए झाल्या. त्यांनी परकीय भाषेचेही ज्ञान घेतले होते. त्यांना जर्मन भाषा अवगत होती. त्यांनी पत्रकारितेचा अभ्यासक्रमही पूर्ण केला होता. शिवाय, त्यांनी मार्केटींग विषयात एमबीए केले होते.